एका काच पात्रांत त्या दोन्ही आसिडांचा गोळा ठेवून पातळ करावा.
नंतर काचेच्या दोन नळ्या (पिपेट) घ्याव्या. प्रत्येक नळी खालच्या बाजूस
निमुळती ( बारीक गोल ) असून तीस शेवटीं गोल वर्तुळ असतें, व
खालच्या बाजूस ती वांकडी असते. अशा दोन नळ्या घेऊन त्यांत
तो पातळ रस ( दोन्ही आसिडांचा ) शोषून भरावा. तो रस त्या
नळ्यांच्या वांकड्या भागांतच भरावा; त्या वाकड्या भागाच्या वर येऊ
देऊं नये. नंतर तो रस थंड होईपर्यंत, त्या नळ्या स्थीर ठेवाव्या.
नंतर पाण्याने भरलेल्या प्याल्यांत उभ्या व आधांतरी ठेवून त्या दोन
नळ्यांमध्यें एक बारीक उष्णतामापक यंत्र ठेवावें. त्या उष्णतामापक
यंत्रानें त्या पाण्याची उष्णता मोजावयाची आहे. त्या प्याल्यास खालून
उष्णता द्यावी ह्मणजे पाणी गरम होऊन त्यांतील नळ्या तापतात.
नंतर त्यांतील रस पातळ होऊन पारदर्शक होतो. रस पारदर्शक झाला
ह्मणजे उष्णतामापक यंत्रांतील पारा किती अंशावर आहे ते पाहून
लिहून ठेवावें. यासच पातळ होण्याचे उष्णमान ह्मणतात. नंतर
खालची उष्णता बंद करून ते पाणी हळू हळू थंड होऊं द्यावें. ह्मणजे
त्या नळ्यांतील रस पुनः घट्ट होऊं लागतो. त्यावेळेस उष्णतामापक
यंत्रांतील पारा किती अंशावर आहे तें पुनः पाहून लिहून ठेवावें. यास
धनीभवनाचें उष्णमान ह्मणतात. हीं दोन्हीं उष्णमानें संयुक्त स्टिअरीक
व पामिटीक आसिडांचीं आहेत, हीं दोन्हीं उष्णमानें समजलीं ह्मणजे
खाली लिहिलेल्या कोष्टकावरून त्यां रसांत स्टिअरीक आसीड किती व
पामिटीक आसीड किती आहे तें समजतें.
स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या मिश्रणाचें पातळ होण्याचें व
घनीभवनाचें उष्णमान समजलें असतां, त्या मिश्रणांत त्यांपैकी दरेक
पदार्थ किती आहे हे समजण्याचें कोष्टक.
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/६३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९