Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७

वर क्यूबिक सेंटीमिटर ( सुमारें एक मासा ) चे आंकडे लिहिलेले अस- तात. त्या आंकड्यांवरून तो द्रव किती आहे तें समजतें. नंतर त्या नळीस खालच्याबाजूस तोटी लावलेली असते तिजमधून तो वरचा द्रव सुमारें २० मासे ( २० क्यू. सें. ) काक फिरवून प्लाटी- नमच्या ताटांत काढून घ्यावा. नंतर तें प्लाटीनमचें ताट मद्यार्काच्या दिव्यावर धरून हळू हळू गरम करावें. ही उष्णता २१२° फा० अंशां- पेक्षा जास्त नसावी. ह्मणजे ईथर उडून जातो व शुद्ध ओलाईक आसीड ताटांत रहातें. जर त्यांत कांहीं पाण्याचा भाग असेल तर तेंही मंद उष्णतेनें उडवून द्यावें. नंतर तें ओलीईक आसीड वजन करावें. प्रथम प्लाटीनमच्या ताटाचें वजन केलेले असले तर ताटासह ओलीईक आसीड वजन करून त्यांत ताटाचें वजन वजा करावें. ह्मणजे ओलीयक आसिडाचें वजन समजतें. नंतर २० क्यू. सें. द्रवांत सांपडलेले ओली- ईक आसीड जर इतकें तर त्या व्युरेट मधील सर्व द्रवांत किती ? हे त्रैराशिकानें काढावें. जें उत्तर येईल तेवढे ओलीईक आसीड १|| ग्राम (दोन आणेभार) स्निग्ध पदार्थात आहे असे समजलें. त्यावरून शेंकडा प्रमाण त्रैराशिकानें काढावें. या पेक्षांही बरोबर प्रमाण काढणे असेल तर, त्या ईथरमिश्र द्रवाची वर सांगितल्याप्रमाणे दोन निरनिराळे नमुने काढून, निरनिराळी परिक्षा करावी. त्या दोन्ही वजनांची बेरीज करून तीस दोहोंनी भागून सरासरी काढावी. नंतर त्या सरासरीवरून शेंकडा प्रमाण काढावें.
 आतां स्टिअरिक व पामिक आसिडें त्या साबूतून कशी काढावीं ती रीत लिहितों.
 वरील कृतीनें ओलीईक आसीड गळाल्यावर त्या गाळण्याच्या कागदावर जो साबू राहिला असेल तो काढून घेऊन एका कांचेच्या परीक्षक नळीत घालावा. नंतर त्यांत पातळ केलेलें हायड्रोक्लोरीक