पान:मेणबत्त्या.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१



हे मिश्रण पिशव्यांत घालून दाबावयाचे असते. म्हणून त्याचे मोठाले तुकडे किंवा चापट मोठाले गोळे करावयाचे असल्यास प्याराफीनच्या दर १०० भागास ७५ भाग नेपथा त्या प्याराफीन मध्ये मिळविण्यास पुरा होतो. पण ढोलक्यावरून ओतून शिऱ्यासारखा पदार्थ तयार करणे असेल तर प्याराफीनच्या दर १०० भागास ९० भाग नेपथा त्यांत मिळवावा लागतो.
 दाबण्याकरितां प्याराफीनचे मोठाले तुकडे पाडणे किंवा शियासारखा पदार्थ तयार करणे या कामास कमीजास्ती नेपथा लागतो. सबब सोईप्रमाणे करावें. नंतर प्याराफीनच्या त्या मोठाल्या वड्या किंवा शिरा जो असेल तो पदार्थ पिशव्यांत भरावा. त्या पिशव्या शोषक पदार्थांच्या केलेल्या असतात. बहुत करून नारळाच्या काथ्याच्या पिशव्या करून त्यांस आंतल्या आंगानें क्यानवासचे कापड लावलेले असते. त्या पिशव्यामध्ये तो पदार्थ भरून, दाबण्याकरितां हायडालिक प्रेसमध्ये त्या मांडाव्या. प्रथम लोखंडी पत्रा ठेवून त्यावर तेव्हढ्याच आकाराचा, बारीक गवताच्या चटईचा तुकडा ठेवावा. त्या चटईच्या तुकड्यावर, प्याराफीन भरलेली पिशवी ठेवून तीवर पुनः तशाच चटईचा तुकडा ठेवून नंतर त्या चटईच्या तुकड्यावर तसाच लोखंडी पत्रा ठेवावा. याप्रमाणे भरलेल्या सर्व पिशव्या ठेवाव्या. यायोगे त्या प्याराफीनचे थर निरनिराळे राहतात व त्यांतील तेल व पातळ पदार्थ बाहेर निघण्याची सोय होते. नंतर पिशव्यांवर त्या प्रेसमध्ये दाब करावा. हे दाबण्याचे काम त्या प्याराफीनमधील सर्व पातळ तेल व तेलकट पदार्थ बाहेर निघून निराळे होईपर्यंत पुनः पुनः करावे लागते. दाबलेल्या प्याराफीनचे तुकडे पारदर्शक दिसू लागेपर्यंत दाबण्याची क्रिया करावी लागते. पिशव्यांतील