पान:मेणबत्त्या.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२


प्याराफीनचे तुकडे पारदर्शक दिसले म्हणजे तें प्याराफीन स्वच्छ झालें असे समजावे. याप्रमाणे बरोबर काळजीपूर्वक काम केले तर तीन वेळ दाबण्याची क्रिया तें प्याराफीन स्वच्छ करण्यास पुरेशी होते. दरेक वेळेस ते पातळ करून स्थिर झाल्यावर त्यांत नेपथा मिळवून थंड करून नंतर त्याचे मोठाले तुकडे किंवा शिरा पिशव्यांत भरून हा. प्रेसमध्ये दाबावे. पुनः पिशव्यांतील प्याराफीन काढून पातळ करून त्यांत नेपथा मिळवावा, नंतर थंड करून पिशव्यांत तुकडे किंवा शिरा भरून हा, प्रेसमध्ये दाबावें. याप्रमाणे करण्याच्या या दरेक कृतीस क्रिया म्हणतात. अशा तीन क्रिया कराव्या लागतात. तीन क्रिया करूनही जर प्याराफीन स्वच्छ न झाले तर तें स्वच्छ होईपर्यंत (पारदर्शक दिसूं लागेपर्यंत) तशाच क्रिया कराव्या.
 कोणी कारखानदार दरेक वेळेस शुद्ध नेपथा वापरीत नाहीत. पण पहिल्या व दुसऱ्या क्रियेतील अशुद्ध नेपथा वापरून प्याराफीन दाबून ऊन करून दाबून काढतात. व तिसऱ्या क्रियेच्या वेळेस तें प्याराफीन ऊन करून त्यांत शुद्ध नेपथा मिळवितात. नंतर दाबून काढतात. त्यायोगें खर्च कमी येतो. याप्रमाणे शेवटच्या क्रियेत जो शुद्ध नेपथा वापरतात तो या तिसऱ्या क्रियेने दाबून निघाल्यावर दुसरे प्याराफीन स्वच्छ करतांना दाबण्याच्या २ या क्रियेत त्याचा उपयोग करतात. व या दुसऱ्या क्रियेने दाबून निघालेला नेपथा तिसरें प्याराफीन स्वच्छ करतांना दाबण्याच्या पहिल्या क्रियेत त्याचा उपयोग करतात. याप्रमाणे काटकसर केली असतां खर्च कमी येतो. याप्रमाणे प्याराफीन स्वच्छ करण्याची कृति काळजीपूर्वक व हुशारीने दरेक वेळेस केली तर तीन क्रिया करून ते प्याराफीन स्वच्छ व पारदर्शक होतें.