पान:मेणबत्त्या.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०



ज्यास जी रीत सोईवार व कमी खर्चाची वाटेल त्याने त्या रीतीचा उपयोग करावा.
 १ ली रीत स्पिरीट डिस्टिलेशन-ज्या पदार्थात प्याराफीन द्रवीभूत होतें तो पदार्थ, प्रमाणानें कमीजास्त व गुणानें शुद्धाशुद्ध वापरण्याच्या इच्छेत्रमाणे हीच रीत वापरणाऱ्या निरनिराळ्या कारखान्यांत थोडा फेरफार करण्याची वहिवाट आहे. मि. यंग मूळ उत्पादक व मेस. वालस कंपनी ग्लासगो हे याच रीतीने प्याराफीन तयार करतात. ती रीत-एका मोठया लोखंडी कढईत शुद्ध करण्याचे प्याराफीन टाकावें. त्या कढईत भोकै भोके असलेली एक लोखंडी नळी लागू करून तिच्यातून वाफ सोडून त्या गरमीनें तें प्याराफीन पातळ करावे. नंतर वाफ बंद करावी व ते पातळ प्याराफीन स्थिर ठेवावे. थोड्या वेळाने त्यांतील मळ, कचरा व पाणी इत्यादि जे त्यांत यांत्रिक रीतीने मिश्र असतात ते पदार्थ तळी जमतात व प्याराफीन वर येते. ते पातळच असते. ते वरचें प्याराफीन, दुसऱ्या एका मोठ्या लोखंडी कढईत काकने किंवा वाकड्या नळीने हळूच काढून घ्यावे. नंतर त्यांत योग्य प्रमाणाने शेलस्पिरीट ह्मणजे नेपथा मिळवावा. त्या नेपथा पदार्थाचे विशिष्टगुरुत्व ०.७३५ पासून ०.७६५ पर्यंत असावें. नंतर ते मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या मोठाल्या वड्या पाडाव्या. किंवा तसेंच पातळ मिश्रण एका ढोलक्यासारख्या गोल व आंतून पोकळ लोखंडी ढोलक्यावर ओतून त्याखाली दुसरे भांडे ठेवून त्यांत तो पदार्थ धरावा. तें ढोलके आंत थंड पाणी भरून फिरते ठेवावे लागतें ह्मणजे त्याजवरील मिश्रण थंड होऊन खालच्या भांड्यात पडलें ह्मणजे शियासारखें घट्ट झाल्यावर