पान:मेणबत्त्या.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९



तात. या मानाने ११८° फा. अंशापेक्षा कमी अंशावर घट्ट होणाऱ्या प्याराफीनबद्दल दरेक कमी अंशास अमुक रकम कमी देईन अशी खरीद करणाराची मागणी असते. ही सर्व माहिती ज्यास्त अशुद्ध द्रव्ये असणाऱ्या प्याराफीनसंबंधाची आहे. अमेरिकन प्याराफीनमध्ये सर्व जातीची अशुद्ध द्रव्ये फारच कमी असतात. त्याच्या निरनिराळ्या नमुन्याच्या घट्ट होणा-या उष्णमानांत फारशी तफावत नसते. तें सुलभ रीतीने स्वच्छ करता येते. बाजारी अमेरिकन प्याराफीन (स्वच्छ न केलेलें ) मेणबत्त्या स्वस्त पाडण्याकरितां, अर्धवट स्वच्छ केलेल्या प्याराफोनमध्ये सुद्धा मिळविता येते. हे गुण स्काच प्याराफीनमध्ये बहुधा नसतात.
 प्याराफीन स्वच्छ करण्याची रीत-या रीति दोन प्रकारच्या आहेत.
 १ ली रीत-ज्या पदार्थांत प्याराफीन द्रवीभूत होतें तो पदार्थ प्याराफीनमध्ये मिळवून नंतर दाबून व गाळून ते स्वच्छ करण्याची रीत. या रीतीस स्पिरीट डिस्टिलेशन प्रोसेस ह्मणतात.
 २ रीत-प्याराफीन ऊन करून फक्त कमीज्यास्त उष्णतेवर त्यांतील भिन्न घटक त्यांच्या पातळ होण्याच्या उष्णमानावर निरनिराळे करून प्याराफीन स्वच्छ करण्याची रीत. या रीतीस स्वेटींग प्रोसेस झणतात.
 पहिल्या रीतींत प्याराफीन ज्या पदार्थात द्रवीभूत होतें तो पदार्थ तें स्वच्छ करतांना कमी होतो त्याची किंमत चढते. दुसऱ्या रीतींत अधिक मेहनत आणि ज्यास्ती सामान लागते त्यांची किमत चढते. ह्मणून