पान:मेणबत्त्या.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० : ९८:: १० : क्ष = ३.९२ हार्डस्केलचा परिणाम मळ व पाणी पातळ तेल दाबून निघालें तें स्वच्छ प्याराफीन स्केल. ह्मणून दरशेकडा २.०० ३.९२ ९४.८ १००.०० - प्याराफीनमध्ये असणारी नेहमींची अशुद्ध द्रव्ये ह्मणजे पाणी मळ व तेले यांचे जे वर ठोकळ प्रमाण दिले त्यापेक्षा जास्त अशुद्ध द्रव्ये वरील परीक्षेने ज्या प्याराफीनमध्ये निघतात त्या प्याराफीनची किंमत त्या मानाने कमी येते. परीक्षेचा एवढा खटाटोप पैशाकरितां करावा लागतो. इंग्रज लोक प्याराफीनच्या घट्ट होणाऱ्या उष्णमानावर त्याची किमत ठरवितात. ती रीत-एक इंच व्यासाची काचेची परीक्षक नळी घेऊन तिच्यांत परीक्षेचे प्याराफीन गरमीने पातळ करून तिच्या तळापासून २ इंच वरपर्यंत भरावे. त्यांच्यांत उष्णतामापक यंत्र ठेवून ती नळी दक्षतेने हालवावी. जेव्हां तें नळींतील प्याराफीन घट्ट होण्यास सुरवात होते तेव्हां त्या उष्णतामापक यंत्रांतील पारा थोडा वेळ एकाच ठिकाणी रहातो. त्या अंशास घट्ट होण्याचे उष्णमान ह्मणतात. ते अंश लिहून ठेवावे. ११८° फा. अंशापेक्षा कमी अंशावर में प्याराफीन घट्ट होते त्यास साफ्ट ( नरम रवा) स्केल ह्मणतात. व ११८ फा. अंशापेक्षां ज्यास्त अंशावर में प्याराफीन घट्ट होते त्यास हार्ड स्केल (कठीण रवा ) ह्मण