पान:मेणबत्त्या.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७



असते, त्याच्या तळावर आंतून गाळण्याच्या मजबूत कागदाचे ६ थर एकावर एक बसवावे; नंतर त्या सहाव्या थरावर स्वच्छ फडक्याचा एक तुकडा ठेवावा. या तुकड्यावर वजन केलेले प्याराफीन पसरावें. नंतर त्यावर तशाच फडक्याचा दुसरा तुकडा ठेवून त्यावर ६ थर गाळण्याच्या कागदाचे ठेवावे. यावेळेस त्या बहुगुण्यांत लागू केलेल्या उष्णतामापक यंत्रांतील पारा ६०°फा. अंशावर असला म्हणजे दाब देण्यास सुरवात करावी. हे दाब देण्याचे काम त्या बहुगुण्यांतील प्याराफीनच्या तुकड्याच्या दर चौरस इंचावर १० हंडेडवेट ह्मणजे त्या सर्व तुकड्यावर १० टन दाब पडेपर्यंत सुरू ठेवावें. दाबाच्या मापाने तासून १० टनांचा दाब झाला की दाब देणे बंद करून तो प्रेस बंद करावा. हा दाब १५ मिनिटें ठेवावा. नंतर तो प्रेस उघडावा. त्यांतील बहुगुण्यांमधील प्याराफीनचा दाबलेला तुकडा बाहेर काढून त्यावरील वेष्टणे हळूच काढून टा. कावी. नंतर तो प्याराफीनचा तुकडा वजन करावा. वजनाचा कमीपणा लिहून ठेवावा. तो तुकडा २५० किंवा १५० (प्रथम जेवढें घेतले असेल तेवढें ) ग्रेनापेक्षा कमी भरला नाही तर त्यांत पातळ तेलें नाहीत असे समजावे. पण असे कधीच घडत नाही. २५० किंवा १५० ग्रेनापेक्षा जेवढे कमी वजन भरेल त्यास पुनः दुरुस्त करावे लागते. कारण प्रथम पाणी व घट्ट अशुद्ध द्रव्ये त्या प्याराफीनमधून काढून टाकलेली असतात व त्यानंतरचे प्याराफीन तपासले असते. ह्मणून १०० भागांत त्याचे वजन कमी भरते. समजा की पाणी व अशुद्ध द्रव्ये शेकडा २ भाग निघालीं व दाबाने २५० ग्रेन प्याराफीनमध्ये १० ग्रेन कमी भरले तर