पान:मेणबत्त्या.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६


करून बाकी राहिलेल्या मापाच्या वजनाइतके पाणी त्या परीक्षा केलेल्या प्याराफीनमध्ये आहे, असे समजावें. ह्मणजे प्रथम परीक्षेनंतरच्या कमी झालेल्या भागांत दुसऱ्या परीक्षेनंतर कमी झालेला भाग वजा करावा; व बाकी राहील तेवढे पाणी त्यांत आहे असे समजावें. या पाण्याच्या वजनाच्या आंकड्यास ५ नी भागले असतां जो आंकडा येईल तेवढ्या वजनाइतके पाणी त्या प्याराफीनच्या १०० भागांत आहे, असे समजावें.
 प्याराफीन स्केल मध्ये पातळ तेलें वगैरे किती आहेत ते तपासण्याची रीत-अविद्राव्य पदार्थ तपासण्याच्या वरील रीतीमध्ये जें वरचे प्याराफीन हळू हळू काढून घेतले असते, ते एका भांड्यांत एक रात्रभर ठेवून सावकाश थंड होऊ द्यावें तें ६०° फा. अंशपर्यंत थंड झालें ह्मणजे दाबण्यायोग्य होते. ज्या खोलीचे उष्णमान नियमित करता येते अशा खोलीत तें प्याराफीन दाबण्याचे काम करतात. पुढे लिहिलेल्या सोयीने ज्या प्रेसमध्ये दाबण्याचे काम होऊ शकते, तसा कोणताही प्रेस तें प्याराफीन दाबण्यास घ्यावा लागतो. त्या सोयीः-१ दाबाची जागा २० चौरस इंच असावी; व दिलेला दाब मापण्याचे साधन असावें. २. लागणारा दाब दर चौरस इंचास १० हड़ेडवेट ( ११२० पौंड) पडावा. ३. दाबतांना त्या प्याराफीनचे उष्णमान ६० फा. अंश असावें. व ४. असा दाब १५ मिनिटें करावा. इतक्या सोयी अवश्य लागतात. असा प्रेस मेरीहिलचे क्लार्कसन व बेकी हे ग्लासगो येथे करतात. त्या प्रेसमध्ये एका वेळेस ४ नमुने एकदम दाबले जातात. परीक्षेच्या प्याराफीनचा वर सांगितलेला नमुना खलबत्यांत ( दगडी ) घोटावा; त्यांतून हार्डस्केल असेल तर २५० ग्रेन व सॉफ्ट स्केल असेल तर १५० ग्रेन बरोबर वजन करून घ्यावा. त्या प्रेसमध्ये बहुगुण्यासारखें एक भांडे