पान:मेणबत्त्या.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५


 प्याराफीन स्केलमध्ये पाणी किती आहे ते तपासण्याची रीत-एक तांब्याचे फ्लास्क (चंबू ) घेऊन त्यास लेबीगचा कंडेनसर जोडावा. त्या फ्लास्कमध्ये नमुन्या पैकीचे प्याराफीन एक ( कच्चा ) शेर घालावें. बनसेनच्या दिव्यावर ते फ्लास्क गरम करावे. अर्करूपाने जो पदार्थ निघेल तो, अरुंद तोंडाच्या व माप माहित असलेल्या ग्राहकांत धरावा. ग्राहकांत येणाऱ्या नळीच्या आजूबाजूस थोडे पाणी चिकटलेले रहाते, त्यासाठी त्या नळीत थोडें ग्यासतेल टाकून हालवून पुनः त्याच फ्लास्कमध्ये टाकावे. व पुनः अर्करूपाने ते पाणी उडवून ग्राहकांत धरावें. नंतर त्या अरुंद तोंडाच्या ग्राहकांत किती पाणी आहे, ते त्यावरील मा. पाच्या आंकड्यावरून तपासावें. जितके ग्रेन ते पाणी असेल त्यास ७० नी भागले असतां जो आंकडा येईल तितके भाग पाणी दर १०० भाग प्याराफीन स्केलमध्ये आहे असे समजावें.
 प्याराफीन स्केलमध्ये पाणी किती आहे ते तपासण्याची दसरी रीत-या रीतीचा प्राइसेस पेटंट क्यांडल कंपनीमध्ये उपयोग करतात. नमुन्याचे प्याराफीन ५०० ग्रेन घेऊन वजन केलेल्या एका चिनी बशीत टाकावे. नंतर त्यास वरचेवर ढवळून खाली उष्णता २३०° फा. अंश द्यावी. ही उष्णता त्यांतून बुडबुडे निघण्याचे बंद होईपर्यंत द्यावी. नंतर किती कमी झाले तें पुनः वजन करून पहावें, व कमी झालेले वजन लिहून ठेवावें. नंतर त्या २३०° फा. अंशपर्यंत ऊन केलेल्या प्याराफीनमधून पुनः ५०० ग्रेन प्याराफीन घेऊन प्रथमच्या रीतीने मंदोष्णतेवर हळू हळू गरम करावे. बुडबुडे निघत नाहीसे झाल्यावर त्याचे वजन करावे. कमी होईल तें माप लिहून ठेवावे. दुसऱ्या मापाप्रमाणे जो भाग कमी होईल तो भाग पाण्याच्या पहिल्या परीक्षेच्या कमी झालेल्या भागांत वजा ५