पान:मेणबत्त्या.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४



धातूची एक शक्काकार नळी समोर खोंचून वांकडी तिकडी करून त्या स्केलमधून पार नेतात. यायोगे त्या पिपांतील प्याराफीन मिश्र होऊन नमुना त्या नळीतून काढून कांचेच्या बुचाच्या रुंद तोंडाच्या बाटल्यांत भरावा. जर त्या बाटल्यांस कांचेऐवजी लांकडी बुचे लावण्याची असतील तर ती लांकडी बुचे अगोदर प्याराफीन मेणांत भिजवून ठेवावी लागतात. असें न केले तर बाष्पोद्गमनाने त्या बाटल्यांतील नमुन्यांपैकी काही भाग कमी होईल व त्या बाटल्यांच्या वरच्या भागी थोडासा ओलावा जमून राहील.
 प्याराफीन स्केलमध्ये मळ किंवा अविद्राव्य पदार्थ किती आहे ते तपासणे.―― या दोन पदार्थात प्याराफीन दाबते वेळी पिशव्यांचे कार्यासतंतु त्यास चिकटून येतात व इतर धुळ वगैरे कचरा मिश्र होतो, इतक्यांचा समावेश होतो. या कामास नमुना सुमारे १ शेर (पौंड), ध्यावा लागतो. नमुना वजन करून मंदोष्णतेवर पातळ करावा व नंतर स्थीर ठेवून त्यांतील मळ तळी बसला ह्मणजे वरचा भाग हळूच काढून घ्यावा. खाली राहिलेल्या कचऱ्याच्या भागांत प्या. राफीन शिवाय, ग्यासतेल (Gasolene ) मिळवून ते मिश्रण भोक असणाऱ्या गाळण्याच्या यंत्रांतून गाळावें. ह्मणजे वर कचरा वगैरे मळ राहतो. या प्रमाणे पुनः एकवार त्यांत ग्यासतेल मिळवून गाळून राहिलेला कचरा काढून सुकवून वजन करावा. हाच त्या प्याराफीन स्केलमधील अविद्राव्य पदार्थ होय. जें वजन होईल त्यास ७०* नी भागावें मणजे प्याराफीन स्केलच्या दर १०० भागांत किती अविद्राव्य पदार्थ आहे ते समजतें.

  • ७००० हजार ग्रेन झणजे एक पौंड होतो सबब ७० या आकड्याने भागल तर १०० प्रेन मधील प्रमाण सांपडते.