पान:मेणबत्त्या.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३



पुनः शुद्ध करावे लागते. शुद्ध करण्यापूर्वी बाजारी प्याराफीनमध्ये, शुद्ध द्रव्य मेणबत्तीच्या उपयोगी पडेल असे किती आहे, ते तपासावे लागते; सबब ती तपासण्याची रीत प्रथम लिहितों.
 प्याराफीन स्केल तपासण्याची रीत-प्याराफीन स्केल हा पदार्थ निरनिराळ्या ठिकाणचा असल्याने भिन्न प्रकारचा असतो. सबब त्याचे घटकही कमी जास्ती प्रमाणाचे असतात. सरासरी त्यांत दरशेकडा १०-१२ भाग अशुद्ध द्रव्ये असतात. त्या अशुद्ध द्रव्यांत ब्लू तेल, कमी उष्णमानावर पातळ होणारी तेलकट द्रव्ये, घट्ट प्रकारचा कचरा व पाणी इतके टाकाऊ पदार्थ असतात. दर १०० भाग प्याराफीनमध्ये २ भाग पाणी व मळ आणि ४-६ भाग पातळ तेले इतकी अशुद्ध द्रव्ये साधारणपणे असतात, असे ठरले आहे; व त्याबद्दल त्या प्याराफीनचे किमतींत कमी आकार वजा करण्याची जरूर नसते. परंतु त्यापेक्षां अशुद्ध द्रव्ये ज्या प्याराफीनमध्ये जास्त निघतात त्या अशुद्ध सर्व द्रव्यांचे वजन त्या प्याराफीनच्या वजनांत कमी करून बाकी राहिलेल्या वजनाची किंमत आकारण्याचा रिवाज आहे. प्याराफीन स्केल पहातानां अनुभविक खरीददाराच्या नजरेस तेव्हांच त्यांतील साधारण कमीपणा दिसून येतो. अमेरिकन प्याराफीन बरेच चांगले व ठरावीक प्रमाणाच्या घटकांचे असते; परंतु स्कॉच प्याराफीनमध्ये वरील प्रमाणापेक्षा अधिक अशुद्ध द्रव्ये सांपडतात. सबब तें प्याराफीन विकणारे व घेणारे यांजमध्ये त्याच्या रसायनिक परीक्षेवरून त्याची किंमत ठरली जाते. ती परीक्षा―
 प्याराफीन तयार करतांना कमती दाबामुळे उत्पन्न झालेले त्यांतील सूक्ष्म फेरफार रासायनीक परीक्षेवरून समजतात. प्याराफीन स्केल लांकडी पिपांत भरून बाजारांत विकण्यास येते. त्या पिपास एक भोक पाडून त्यांतून