पान:मेणबत्त्या.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



याप्रमाणे छापून प्रसिद्ध झालेली पुस्तक.

 १ बटनः-यांत निरनिराळ्या पांसष्ट प्रकारची बटनें कशी व कशाची करावी याची सचित्र माहिती दिली आहे. किंमत चार आणेटपालखर्च अर्धा आणा. व्ही. पी. ने सहा आणे. याची पहिली आवृति खपून गेल्याने दुसरी काढिली आहे.
 साबू:-यांत नाना प्रकारचे साबू करण्याची माहिती दिली आहे. साबू तयार करितांना लागणारे इतर जिन्नस जसे:-पाणी, खार, तेलें, चरबी, आणि त्यांतील आसिडें, ग्लिसराईन, यांचीही माहिती दिली असून, त्याकामी लागणारी भांडी कढया, सांचे, प्रेस वगैरेची चित्रेही दिली आहेत. किंमत दोन रुपये शिवाय टपालखच व्ही. पी. ने २ रुपये ४ आणे.
या दोन्ही पुस्तकांस दक्षिणाप्राईझ कमिटीनी बक्षीसें दिली आहेत.
  मेणबत्याः-यांत प्राणिज, खनिज व वनस्पतिज स्निग्ध पदार्थापासून मेणबत्त्याचे घट्ट द्रव्य तयार करण्याची सचित्र माहिती २९ रीतींच्या ४५ प्रकारांनी दिली आहे.
 तसेंच-या कामी लागणारी भांडी. कढया, प्रेस, सांचे, व इतर जिनसांचीही तपशीलवार माहिती दिली असून तदनुषंगीक तयार ह णारे पदार्थ शुद्ध करण्याचीही माहिती दिली आहे. शेवटी सूची जाडस आहे. किंमत रु. १॥ व्ही. पी. नें, रु. १॥