पान:मेणबत्त्या.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पत्त्यासह आमचेकडे लिहून कळवावी. ह्मणजे त्यांस कायम वर्गणीदार समजून त्यांची नावें कायम वर्गीदारांच्या रजिस्टरांत नोंदली जातील. पैसे अगोदर पाठविण्याचे कारण नाही.
 ५. कायम वर्गणीदारांच्या नांवाची यादी दर एक पुस्तकास जोडली जाईल.
 ६. वाचनालये ( लायऱ्या) कायम वर्गणीदार नसतील तरी त्यांस टपालखर्च पडणार नाही. कायम वर्गणीदार झाले तर ३ रा नियम पूर्णपणे त्यांस लागू आहे.
 ७. पुस्तकाच्या किंमतीपेक्षा जास्त रकम देणाऱ्या गृहस्थांचे अथवा संस्थाचे आभारप्रदर्शक लेख त्या पुस्तकांत जोडले जातील.
 ८. पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांतील विषयांची माहिती कायम वर्गणीदारांस कळविण्यात येईल.
 ९. हुनरसंबंधी मासिक पुस्तकें दोनचार निघाली व वर्गणीदारांच्या हाती, दिलेल्या पैशाच्या मोबदल्यांची पुस्तकें जाण्यापूर्वीच ती लयास गेली, यामुळे लोकांत फार अविश्वास उत्पन्न झाला. त्या करिता अगोदर पुस्तक तयार होऊन ग्राहकांच्या हाती पडतानां पैसे द्यावे अशी व्यवस्था केली आहे. येणेकरून ग्राहकांच्या ऋणांत राहावें लागणार नाही; व त्यामुळे अविश्वास उत्पन्न होण्याचेही कारण रहाणार नाही.

मु० अनुसूया लेपर हॉस्पिटल,

पोस्ट सिनोर

ता. २६ एप्रील १९०६.

शंकर यज्ञेश्वर गर्गे, हॉस्पिटल असिस्टन्ट,