पान:मेणबत्त्या.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



यापुढे प्रसिद्ध होणारे पुस्तक.
रंग व वारनीस.
रंग.'


 यांत ज्या विषयांचा समावेश होईल ते:—  १ रंगाच्या कोरड्या भुकट्या-यांत काळा, निळा, हिरवा, तांबडा, पांढरा, व पिवळा इतक्या रंगांच्या भुकट्या कशाच्या व कशा कराव्या ती माहिती येईल.
 २ ऑईल पेन्टस ( Oil paints ) यांत तेलकट व चिकट रंग डब्यांत भरून ठेवता येतात तेः―
  यांत १ वाहक अथवा द्रावक ज्यांत रंग मिळवून ओलसर करावयाचा तो पदार्थ व रंग या दोहोंचे मिश्रण कोणत्याही पदार्थास लावल्यानंतर तो लवकर सुकला जावा ह्मणून त्यांत मिळवावयाचा पदार्थ ( Drier ) इतक्यांचा समावेश होतो. जसें १ जवसाचें तेल २ कोबालट म्यांगनीज व बेनझायेटस ३ कोबाल्ट म्यांगनीज ४ रेझीनेटस ५ झुमोटीक ६ म्यांगनीज आकसाइड ७ गायनीमरस इतक्या पदा। यीचा उपयोग व माहिती यांत येणार आहे.
३ वाटर कलर्स-पाण्यात मिसळून उपयोगांत घेतात ते रंग.
४ विशेष प्रकारचे रंग-१ तांब्याचा रंग २ सोनेरी रंग ३ लोखंडी रंग ४ चुन्याचा रंग ५ रेतीचा ( Silicated ) रंग.

५ रंग दळणे सुकवणे व भरून ठेवणे वगैरे अनुषंगीक माहिती.
वारनीस.

१ जागा, भट्या, व भांडी यांची माहिती:-वारनीसाचे प्रकार.
१ सुकणारे २ जपान गोल्ड साईज ३ आस्फालटम ४ लोखंडाचे ५