पान:मेणबत्त्या.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१



भाग ४.
 १६ प्याराफीन मेण-प्याराफीन बनविण्याच्या उद्योगास प्रथम डा. यंगने सुरुवात केली. डरबीशायरमध्ये आलफ्रेटन गांवी खनिज तेलाचा झरा सतत वहात होता. डा, लायनच्या सांगण्यावरून डा. यंगने त्या तेलांतून प्याराफीन, जळणारे पातळ तेल व वंगणाची जाडी चरबी इतके पदार्थ सन १८४८ साली तयार केले. सन १८५० साली डा. यंगर्ने खनिज कोळशांपासून वरचे पदार्थ तयार करण्याचे पेटंट (हक्क) घेतले. या पेंटटापूर्वी मि. राज यांनी पिट नामक कोळशांतील डांबरापासून प्याराफीन व पातळ तेल तयार केले होते.

 लिनलीथगो व मिडलोधीअन प्रांतांत बायटुमिनस नामक खनिज कोळसा पुष्कळ निघत होता ह्मणून सन १८६२ सालापासून त्याच (बायटुमिनस) कोळशांतून प्याराफीनचे तेल काढतात. सरासरी एक टन त्या जातीच्या कोळशापासून ३०० शेर (कच्चे) प्याराफीनचे तेल निघत. याप्रमाणे प्रथम अर्करूपाने काढलेलें जें कच्चे तेल त्यास आसीड व सोड्याने धुवून टाकतात. धुवून साफ करतांना डांबरासारखे जे पदार्थ निघतात. ते पुनः प्रथमच्या ग्राहकांत तेल काढण्याकरितां टाकतात; व तें धुतलेलें (स्वच्छ केलेले) तेल पुनः नळिकायंत्रांत घालून अर्करूपाने खेंचून काढतात. या दुसऱ्याने अर्करूपाने काढलेल्या तेलास प्रीनआईल ह्मणजे हिरवें तेल असें ह्मणतात. नंतर ते ३६° फा. अंशपर्यंत थंड करून गाळण्याच्या प्रेसमधून गाळून काढतात. त्यायोगाने गाळण्याच्या प्रेसवर खळीसारखा घट्ट व हिरवा गोळा रहातो व खाली पातळ तेल जमते. तो घट्ट हिरवा गोळा हायडालीक प्रेसमध्ये दाबून काढतात.