पान:मेणबत्त्या.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०



जळत नाही. मणून चरबी व ताडाच्या तेलापासून स्टिअरीक व पामिटीक आसिडें तयार करण्याच्या रीतीप्रमाणे या तेलांतील घट्ट स्निग्ध आसिडे काढून त्याचा मेणबत्त्या करण्याकडे उपयोग करावा. या तेलांतून निघणाऱ्या घट्ट स्निग्ध आसिडांचे पातळ होण्याचे उष्णमान कमी जास्त आहे. संबब ते उष्णमान मागे लिहिलेल्या कृतीने तपासून नक्की करावें. ते १२५° फा. अंशांपेक्षा जास्त असेल तर त्या एकट्याच द्रव्याच्या मेणबत्त्या कराव्या. त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा ज्यास्त उष्ण मानावर पातळ होणा-या घट्ट स्निग्ध आसिडाबरोबर तें मिश्र करून नंतर त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्त्या कराव्या. चरबी व ताडाच्या तेलांतील घट्ट स्निग्ध आसिडे काढण्याची रीत पुढे दिली आहे.
 १४ मिरटील मेण―हे पण तेलच आहे. कारण यांतही ग्लिसराईन असते. ह्मणून याची मेणबत्ती चांगली जळत नाही. जपानी मेणाच्या वरील कृतीप्रमाणेच यापासूनही मेणबत्तीचे द्रव्य तयार करावें. ती रीत पुढे लिहिली आहे.
 १५ ताडाचे मेण―हे निरनिराळ्या जातीच्या ताडाच्या झाडांच्या सालींपासून, खोडांपासून, फांद्यांपासून व फळापासून काढतात, ते ते भाग खरबरीत कुट्टन एका लोखंडी कढईत पुष्कळ पाण्याबरोबर टाकून उकळावे. ह्मणजे त्यांतील मेण सुटे होऊन पाण्यावर तरंगते. थंड झाल्यावर मेण वर जमतें तें काढून घ्यावे. मधमाशांचे मेण स्वच्छ करण्याच्या रीतीप्रमाणे हे मेणही स्वच्छ व शुद्ध करावें.