पान:मेणबत्त्या.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९



केलेला स्परम्यासिटी पदार्थ पांढरा, पत्रेदार, ठिसूळ, निर्गुण, चवरहित व गंधहीन असतो. त्याचे पातळ होण्याचे ऊष्णमान ११००-१२०° फा. असते. यांत मुख्यत्वे सेटीलीक पामिटेट नांवाचें द्रव्य असते. त्याच्या ओतीव किंवा मिश्र मेणबत्या कराव्या.
 ११ कार्नोबा मेण― हे मेण फार ठिसूळ व टणक असल्यामुळे याच्या एकट्याच्याच मेणबत्त्या करीत नाहीत. परंतु तें मेणबत्त्यांच्या इतर द्रव्यांबरोबर मिश्र करून मेणबत्त्या करण्याच्या कामी वापरतात. सबब त्यास शुद्ध व स्वच्छ करावे लागते. मधमाशांचे मेण स्वच्छ करण्याच्या रीती वर लिहिल्या आहेत, त्याप्रमाणेच कार्नोबा मेण शुद्ध व स्वच्छ करावें.
 १२ चिनी वनस्पतीचे मेण―हे तयार करतानांच काळजीनें - काम केले तर पांढरें स्वच्छ मेण तयार होते. पांढरें स्वच्छ नसेल तर पुढील कृतीने करावें. ती रीत-१०० भाग मेणास १०-१५ भाग पाणी मिळवून एका लोखंडी कढईत ऊन करून पातळ करावे. नंतर खूप जोराने ढवळून स्थीर ठेवावे. ह्मणजे ६-८ तासांनंतर खाली पाणी व कचरा रहातो आणि वर स्वच्छ मेण जमते, ते काढून ठेवावे. या मेणाचे पातळ होण्याचे उष्ण मान १०४°फा, अश आहे; सबब याच्या एकट्याच्याच मेणबत्या करीत नाहीत. ह्मणून हे द्रव्य, यापेक्षा अधिक उष्ण मानावर पातळ होणाऱ्या मेणबत्यांच्या इतर द्रव्यांत मिळवून त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्त्या करतात.
 १३ जपानी मेण (काकड शिंगीचे तेल)-हें घट्ट असल्यामुळे यास मेण ह्मणतात. परंतु वास्तविक रीतीने झटले तर हे तेल आहे. कारण यांत ग्लिसराईन असते. याचा रंगही पिवळट किंवा हिरवट असतो. यांत ग्लिसराईन असल्यामुळे याची मेणबत्ती चांगली