पान:मेणबत्त्या.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८


शेर (कचे) स्परम्यासिटास १०-१२° बामहायडामिटर अंश प्रमाणाचा १५-२० शेर सोडा द्रव मिळवून ते सर्व मिश्रण काही वेळ उकळावें. ह्मणजे त्यांत असलेल्या तेलाचा साबू बनतो. स्परम्यासिटी हा पदार्थ सोडा किंवा पोटयाशबरोबर रसायनरीतीने मिश्र होत नाही. नंतर तें मिश्रण स्थीर ठेवावे. ह्मणजे पातळ साबू खाली राहून स्परम्यासिटी वर जमतो.
  इ. गरम दाब-वर आलेला स्परम्यासिटी नळाने किंवा पळीने चपटया चौकोनी साचांत टाकावा. हे साचे लोखंडी पातळ पत्र्याचे केलेले असून सपाट व लहान असतात. त्यायोगे तो लौकर थंड होतो. घट्ट झाल्यावर पुनः दळून त्याची भुकटी करावी. पांढऱ्या घट्ट कापडाच्या पिशव्यांत ती भुकटी भरून त्यांची तोंडे गच्च बांधावी. त्या पिशव्या गरम केलेल्या लोखंडी तुकड्यांवर ठेऊन ते तुकडे हायडालिक प्रेसमध्ये ठेवून पिशव्यांवर दाब करावा. हा प्रेस आडवा ठेवावा लागतो व त्यासही वाफेनें गरम करावे लागते. ह्मणजे त्यांत अझून असलेले थोडे तेल बाहेर निघतें व पिशव्यांत घट्ट व बऱ्याच चांगल्या रंगाचा स्परम्यासिटी रहातो.
 फ, त्या पिशव्यांतील तो पदार्थ काढून घेऊन एका लोखंडी भांड्यांत घालावा. त्यांत तीव्र सोडा किंवा पोटयाशचा जोरदार द्रव (बामहायडामिटर २००-२५० अंश प्रमाणाचा याच्या १०० भागांत १० पासून १५ शेर तीव्र आलकली असते) शेकडा तीन चार शेर मिळवून ते मिश्रण उकळावे. उकळतांना ते मिश्रण २३५° फा. अंशापर्यंत गरम होऊ द्यावे. नंतर उष्णता बंद करून ते मिश्रण स्थीर ठेवावें मणजे वरती स्परम्यासिटी जमतो; तो काढून घेऊन इच्छित आकाराच्या मोठ्या वड्या पाडून सांठवून ठेवावा. याप्रमाणे स्वच्छ