पान:मेणबत्त्या.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७




पिशवी सोडून तिच्यांत जमलेला घट्ट स्पस्म्यासिटी पदार्थ काढून घ्यावा. या वेळेस त्याचा रंग काळसर तपकिरी असतो. याप्रमाणे स्परम्यासिटी द्रव्य स्पर्म तेलांतून निराळे करावें.
 ब. दाबणे-पहिला दाव-गाळून काढलेल्या स्परम्यासिटीत अजून थोडे तेल असते. ते काढण्यास्तव त्यास दाबावे लागते. ह्मणून तो स्परम्यासिटी पदार्थ तागाच्या ( सणाच्या ) पिशव्यांत भरावा व त्या पिशव्या हायड्रालीक प्रेस ( एक विशेष प्रकारचा दाबण्याचा साचा ) मध्ये ठेवून त्यावर दाब करावा. हा दाब, भरलेल्या पिशवीच्या दर चौरस इंचावर ८० टन याप्रमाणे असावा. यायोगें त्या स्परम्यासिटीत जो तेलाचा भाग असतो, त्यापैकी बराच भाग बाहेर निघतो.
 क. दुसरा दाब-वर सांगितल्याप्रमाणे दाबलेला स्परम्यासिटी घेऊन उष्णतेने एका लोखंडी भांड्यांत पातळ करावा. सर्व पातळ झाल्यावर उष्णता बंद करून तो हळूहळू थंड होऊ द्यावा. ह्मणजे रवेदार कठीण होतो. नंतर तो दळून भुकटी करावी. नंतर सणाच्या कापडाचे समचौरस तुकडे घेऊन त्यांत ती भुकटी घालून मोठाल्या पुड्या बांधाव्या. या पुड्या मोठ्या जोरदार हायड्रालीक प्रेसमध्ये ठेवून दाबाव्या. त्या मोठ्या हा. प्रेसचा दाब दर चौरस इंचावर ६०० टन पडेल अशा प्रमाणाचा असावा. या दाबाने में तेल बाहेर निघते, त्यांत थोडासा स्परम्यासिटी असतो; ह्मणून तें तेल प्रथमच्या उंच हौदांत टाकावे ह्मणजे पुनः उपयोगांत येते.
 ड. याप्रमाणे तयार केलेला स्परम्यासिटी घट्ट असतो परंतु त्यांत थोडे तेल व तेलाचा रंग असतो ह्मणून तो स्वच्छ करावा लागतो. ती रीतः-स्परम्यासिटी एका मोठ्या लोखंडी भांड्यांत घालून पातळ करावा. त्यांत तीव्र सोड्याचा किंवा पोट्याशचा द्रव मिळवावा. सरासरी १००