पान:मेणबत्त्या.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६



भरून तो हौद उंच ठिकाणी ठेवावा. त्यांतून तेल बाहेर काढण्यास त्याच्या तळाजवळ एक नळी लावावी. सणाच्या कापडाच्या पोत्यासारख्या मोठाल्या पिशव्या (Bags) तयार करून त्या पिशव्यांस आंतून घट्ट पांढ-या कापडाचे अस्तर लावावें. झणजे त्या दुहेरी पिशव्यांची आंतील बाजू पांढऱ्या कापडाची व बाहेरील बाजू सणाच्या कापडाची होते. पिशव्यांची दोन्ही तोंडे मोकळी असावी. या पिशव्यांत काही पदार्थ भरला असता त्याचा आकार लंबगोल व्हावा ह्मणजे धान्य भरण्याच्या पोत्यासारखा आकार त्यांचा असावा. नंतर अशी एक पिशवी घेऊन तिचे खालचे तोंड दोरीने घट्ट बांधून बंद करावे. वरच्या मोकळ्या तोंडांत तेलाच्या हौदाच्या नळीचा शेवट बसवून त्या नळीवर त्या पिशवीचे मोकळे तोंड दोऱ्याने घट्ट बांधून टाकावे. झणजे हौदांतील तेल नळी वाटे पिशवीत बाहेर न सांडतां येते अशी योजना करावी. या पिशवीत तेल भरल्यावर तिचे वजन वाढते, यामुळे ती खाली पडण्याचा संभव असतो. ह्मणून ती नळीच्या शेवटावर फारच घट्ट बांधावी लागते. ती पिशवी त्या नळीपासून खाली लोंबती ठेवावी. व तिच्या खाली त्या हौदा एवढाच दुसरा हौद ठेवावा. नंतर त्या नळीतून हौदांतील तेल बांधलेल्या पिशवीत सोडावें व पिशवी तेलाने भरावी. या वेळेस ती जास्त वजनदार वाटल्यास बाजूला कांहीं आधार द्यावा. पिशवीत तेल भरले झणजे त्या तेलाच्याच वजनाने त्या दोन्ही कापडांच्या थरांतून तेल खालच्या हौदांत पडतें. तेलांतील पातळ भाग तेवढा कापडांतून खाली हौदांत पडतो; व घट्ट पदार्थ पिशवीतच रहातो. ही कृति करतांना हवेचे उष्णमान १००° फा. अंशांच्या आंत असावें. याप्रमाणे तेलांतील पातळ भाग लौकरच बाहेर निघतो व घट्ट भाग पिशवीतच रहातो. पातळ भाग बाहेर निघण्याचे बंद झाल्यावर ती