पान:मेणबत्त्या.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५



 ३ ब. मेणाचे बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ चादरीवर उन्हांत ठेवावे. शंभर भाग पाण्यांत तीनपासून सहा भाग शुद्ध पापडखार मिळवून ते पाणी त्या मेणाच्या तुकड्यांवर वरचेवर शिंपडीत जावें. तुकडे वरखाली फिरवून पुनः ते पाणी शिंपडून उन्हांत सुकवावे. या प्रमाणे ५।६ दिवस कृती केली ह्मणजे मेण पांढरें स्वच्छ होते. ही कृति करण्यापूर्वी मेण व पाणी एकत्र करून उकळावे आणि ते स्थिर ठेवून वरचे मळरहित मेण काढून घेऊन नंतर पापडखाराचे पाणी त्याच्या तुकड्यांवर शिंपडून पांढरें करावें. या कृतीने आलेला पांढरेपणा फार दिवस टिकत नाही, असे कोणी ह्मणतात. याप्रमाणे तयार केलेले मेण पाहिजे तितकें पांढरे झाल्यावर उकळत्या पणयांत धुवून नंतर मेणबत्यांच्या कामी वापरावे. ह्मणजे पापडखाराचा अंश मेणांत न येतां पाण्यांत निघून जातो.
 .९ पीला अथवा चिनी मेण हे मेण जातीनेच पांढरें स्वच्छ व कठिण असते. हातास तेलकट किंवा चिकट लागत नाही. मळ वगैरे पदार्थ त्यांत असल्यास पाण्यात टाकून गरमीने पातळ करून स्थीर ठेवावे. ह्मणजे मळ वगैरे इतर पदार्थ तळी जमून वर स्वच्छ मेण तरंगते. ते घट्ट झाल्यावर काढून घ्यावे.
 १० स्परम्यासिटी-हे पांढरे द्रव्य स्परम नामक माशाच्या तेलांतून काढतात. त्या माशाच्या जातीस फिझेटर म्याक्रोकेफेलस असें नांव आहे. हे माशाचे तेल ऊन करून थंड होण्यास स्थीर ठेवावें ह्मणजे त्याच्या तळी स्परम्यासिटी पदार्थ जमतो. परंतु व्यापाराच्या कामी हा पदार्थ तयार करण्याची रीत खाली लिहिली आहे.
 अ. प्रथम हा पदार्थ त्या तेलांतून निराळा करावा लागतो. त्यास गाळणे अशी पारिभाषिक संज्ञा आहे. एका लोखंडी हौदांत हे तेल