पान:मेणबत्त्या.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४


मधमाशाचा थर काढून टाकावा व बाकीचा मळकट भाग दुसऱ्या वेळेस मेण स्वच्छ करतांना त्यांत मिळवावा. घट्ट झालेले मेण स्वच्छ, पांढरें व कठिण असते.
 २ अ. रसायनरीतीनें मेण स्वच्छ करण्याची दुसरी रीत  चिनीमातीचे किंवा साध्या मातीचे (पके भाजलेलें) एक मडके घेऊन त्यांत मेण पातळ करावे. ते पातळ करण्यास वाफेची उष्णता द्यावी, किंवा फार गरम अशा खाऱ्या पाण्याच्या पात्रांत ते मडके ठेवून उष्णता द्यावी. मेण पातळ झाल्यावर त्यांत नाइटीक आसीड (फार शुद्ध व घट्ट ह्मणजे कमी पाणी असलेले) काळजी पूर्वक मिळवावें. दर १०० भाग मेणास १ भाग नाइस्ट्रीक आसीड मिळवावे. नंतर ते सर्व मिश्रण उकळत ठेवावे. ह्मणजे त्यांतून नाइट्रीक आसिडाची वाफ निर्धू लागते. त्या वाफेस नाइट्रीक आसिडासारखा तिखट व कोंदट वास येत असतो. ती वाफ निघणे बंद झाल्यावर, उष्णता बंद करावी; व तें मडकें स्थिर ठेवावें. पुढे वरील कृतीप्रमाणेच वरचे मेण गरम पळीने काढून साचांत टाकावें. घट्ट झाल्यावर इच्छित आकाराचे व वजनाचे तुकडे पाडून कोठारांत भरून ठेवावे.
 या कृतीने शुद्ध केलेलें मेण चकाकीत, अर्ध पारदर्शक व चांगल्या रंगाचे होते. चकाकीत होणे हा गुण 'पातळ मेण रसायनिक कृतीनंतर स्थीर ठेवून वरचा स्वच्छ भाग तेवढाच काढून घेण्यावर अवलंबून असतो. मेण काढून घेण्याची भांडी बरीच गरम असावी ह्मणजे काढसांना मेण त्यांस चिकटत नाही. याप्रमाणे शुद्ध केलेल्या मेणांत वाती बुचकळून किंवा ते मेण इतर द्रव्यांबरोबर मिश्र करून ओतीव मेणबत्या करतात.