पान:मेणबत्त्या.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३



सोडून पातळ तंतुमय छिलटे काढावेत आणि उन्हांत पाणी शिंपडून सुकवावें. पावसाळ्यांत या कृतीने मेण करड्या रंगाचे होते. व तो करडा रंग पुढे कायम रहातो. ह्मणून ही कृति पावसाळ्यांत करू नये. या रीतीने तयार केलेले मेण पांढरे स्वच्छ असते.
 २ रसायनरीतीने मेण स्वच्छ करण्याची रीत-बाजारांत में कच्चे मेण (शुद्ध केल्याशिवाय) विक्रीकरितां येते, त्यांत माती मधमाशा व त्यांचे पंख आणि इतर बारीकसारीक पदार्थ असतात. ह्मणून ते पदार्थ त्यांतून वेगळे करावे लागतात. एक, तांब्याची स्वच्छ कढई अथवा दगडी हौद तयार करून त्यांत मेणाचे बारीक तुकडे करून टाकावे. केवळ दगडाचाच हौद पाहिजे असे नाही. दवाखान्यांत मलम, गोळ्या वगैरे तयार करण्यास ज्या शिळा वापरतात त्या द्रव्याचा जरी हौद किंवा कढई असली, तरी चालते. चुना व रेती मिळून हे द्रव्य तयार करतात. १० भाग मेणास ४-५ भाग पाणी त्यांत मिश्र करावे. व वाफेची उष्णता सुरू करावी. नंतर ते सर्व मेण पातळ होऊन ६।१० मिनिटे उकळू द्यावे. नंतर उष्णता बंद करावी. नंतर दर ११० शेर मेणास १२-१५ तोळे सलफ्युरीक आसीड या प्रमाणानें सलफ्युरीक आसीड त्या पातळ मेणाच्या पृष्टभागावर थोडथोडे ओतावें. ही कृति फार जपून करावी. नाहीतर पातळ झालेल्या मेणावर फेस येऊन तें कढईच्या बाहेर उतूं जाते. नंतर त्या कढईवर झाकण ठेवून ती स्थिर ठेवावी. ह्मणजे तळी मळ वगैरे सर्व अशुद्ध पदार्थ जमतात. व वरती स्वच्छ मेण जमते. ते बरेंच थंड झाले ह्मणजे पळीने किंवा तशाच मोठ्या व गरम पात्रानें शुद्ध मेण काढून दुसऱ्या भांड्यांत ठेवून घट्ट होऊ द्यावे. सर्व शुद्ध मेण काढून घेतांना तळी जमलेला मळ मात्र हालवू नये. तळी राहिलेला मळाचा गोळा काढून त्याच्यांतील