पान:मेणबत्त्या.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२



ह्मणजे मेणांतील मळ वगैरे इतर पदार्थ तळी बसतात. या क्रियेस स्वच्छ करण्याची क्रिया ह्मणतात.
 ब. पहिल्या हौदांतील वरच्या कृतीने तयार झालेले पातळ मेण, नळाने दुसऱ्या हौदांत सोडतात. दुसऱ्या हौदाच्या तळास कुईल पेनाच्या आकाराची भोके पाडलेली असतात. पातळ मेणाचा प्रवाह त्या भोकांतून, दुसऱ्या हौदाखाली ठेवलेल्या गोल पात्रावर टिपकत असतो. हे गोल पात्र पंचपात्रासारखें किंवा ढोलक्यासारखें लंबगोल असते. व ते तिसऱ्या हौदांत बसविलेले असते. दुसऱ्या हौदाखाली तिसरा हौद ठेवून त्यांत पाणी भरतात. त्या पाण्यांत तें गोलपात्र अर्धे बुडलेले ठेवावे. अशा रीतीने त्याची मांडणी करून ते गोल पात्र त्या पाण्यांत फिरतें ठेवावे. दुसऱ्या हौदांतील पातळ मेण ढोलक्यावर टिपकत असते व तें ढोळके पाण्यात फिरत असल्यामुळे त्यावर पाणी असते व त्या पाण्यावर पातळ मेण टिपकत असते. तें मेण फितीसारखें फार पातळ होऊन (चपटे तंतुरूप) त्याचे पातळ थर प्रथम पाण्याखाली जातात. नंतर त्याच (तिसया) हौदांतील पाण्याच्या पृष्ठ भागावर येतात; ते तेथून एका वांकड्या कलथ्याने काढून घ्यावेत.
  क. नंतर किंतानाच्या किंवा मजबूत खादीच्या स्वच्छ चादरी उन्हांत मोकळ्या हवेवर अंथराव्या. त्या चादरीवर ते तंतुमय मेण (पातळ व चपटे बारीक तुकडे) सारखें व पातळ असें पसरून टाकावें. यायोगें त्यास ऊन व हवा लागून ते स्वच्छ होते. याप्रमाणे हवेच्या मानाने तें मेण चारपासून दहा आठवडेपर्यंत उन्हांत ठेवावें. मेणाच्या प्रत्येक कणास ऊन व हवा लागावी ह्मणून ते थर वरचेवर उलथपालथ करावे. त्याचप्रमाणे त्या मेणावर वरचेवर पाणी शिंपडावे. वरील मुदतीत एक किंवा दोन वेळां तें मेण पुनः ऊन करून ढोलक्यावरून पाण्यात