पान:मेणबत्त्या.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०


ती रीत पुढे येईल. हे तेल बाजारांत निरनिराळ्या प्रकारचे असते. त्यांत बासपामआईल नांवाचा या तेलाचा नमुना सर्वात अधिक घट्ट असतो.
 ६ ताडाच्या बियांचे तेल-ताडाच्या तेलांतील घट्ट स्निग्ध आसिडांपेक्षा या तेलांत घट्ट स्निग्ध आसिडें कमी असतात. ह्मणून या तेलापेक्षां ताडाच्या तेलाचाच उपयोग मेणबत्यांच्या कामी अधिक होतो. तरी पण ताडाच्या तेलाऐवजी हे तेल चरबीबरोबर मिश्र करून सुटी व घट स्निग्ध आसिडे काढता येतात. ती रीत पुढे येईल. या तेलासही शुद्ध करण्याची जरूर नसते.
 ७ पाइनी तेल-शिवणीच्या फळांचें तेल–हें बरेंच घट्ट असते व त्याचा रंग पांढरवट किंवा पिवळा असतो. त्यास पुढे लिहिल्याप्रमाणे स्वच्छ करतात. हे तेल पाण्याबरोबर मिश्र करून लोखंडी पंचपात्राकार भांड्यांत घालावे. त्या पात्रास ३०००-४००° फा. अंशाची उष्णता देऊन स्थिर ठेवावें झणजे सर्व मळ पाण्यात राहून वर घट्ट तेल जमतें. इतके करूनही जर ते चांगले पांढरें न झाले, तर पुढील कृति करावी. १० भाग तेलास -11.-.- भाग सलफ्युरीक आसीड व २५ भाग पाणी यांचे मिश्रण करून तेलांत मिळवावें. तें सर्व मिश्रण उकळावें. एक उकळी आली की उष्णता बंद करून स्थिर ठेवावे. ह्मणजे स्वच्छ होते.
  वरील दोन्ही रीतींनी हे तेल स्वच्छ केल्यानंतर पुनः एकदां गोड्या पाण्यात टाकून उकळावे ह्मणजे अधिक स्वच्छ व निर्भेळ ( मळ खळ याशिवाय ) होते. या तेलाचे पातळ होण्याचे उष्णमान ९७ फा. अंशापेक्षा अधिक नाही. ह्मणून ह्या एकट्याच तेलाच्या मेणबत्या करीत नाहीत. परंतु स्टिअरीक किंवा स्टिअरोपामिटीक किंवा कृतीचे पामिटीक आसीड यांपैकी कोणतेही एक या तेलाबरोबर मिश्र करून मिश्र मेणबत्या बनवितात,