पान:मेणबत्त्या.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४८



तेल थिजवावें झणजे पिशव्यांत भरण्यास फावतें, नंतर दाबाने त्याच उष्णमानावर त्यांतील ओलियन निघत नाहीसे झाल्यावर, उष्णमान थोडे थोडे वाढवीत जावें. परंतु ६५° फा. अंशांपेक्षा जास्त उष्णमान होऊ देऊ नये. खोबरेल तेल दाबतांना जितके जास्त कमी उष्णमान असेल, त्या प्रमाणाने निघणारे स्टिअरीन अधिक चांगले असते. याप्रमाणे खोबरेल तेल पिशव्यांत भरून हायड्रालिक प्रेसमध्ये त्या पिशव्या दाब-. ल्या ह्मणजे पातळ पदार्थ जें ओलियन ते बाहेर पडून पिशव्यांत घट्ट पदार्थ-स्टिअरीन रहाते. ह्या पिशव्या पूर्ण रीतीने दाबल्या गेल्यावर त्यांतून ओलियन निवत नाही, किंवा त्याचे एक दोन थेंब फार वेळाने झिरपू लागतात, अशी स्थिति झाली झणजे तें पूर्ण दाबले गेले आहे. असे समजावे. नंतर पिशव्यांतील कठीण गोळा काढून घेऊन शुद्ध करावा.
 शद्धीकरण-पिशव्यांतील स्टिअरीन, कल्हई केलेल्या तांब्याच्या कढईत टाकावें, ती कढई वाफेने किंवा मंदोष्णतेनें गरम करावी. त्या कढईतील स्टिअरीनमध्येही बरीच उष्णता असू द्यावी झणजे त्यांतील मळ वगैरे अशुद्ध पदार्थ तळीं बसतात. नंतर उष्णता बंद करून काही वेळ ती कढई स्थिर ठेवली असतां स्टिअरीन वर जमतें तें काढून घ्यावें. मळ वगैरे इतर अशुद्ध पदार्थ तळी जमतात. यापेक्षाही स्टिअरीन अधिक स्वच्छ करणे असेल तर एक मोठे नरसाळे घेऊन त्यांत फ्लानेलचा कपडा आतील बाजूस लावावा. त्या कपड्यावर शोषक कागद ( Blotting paper ) लावावा. नंतर ऊन केलेले स्टिअरीन त्या कागदावर हळू हळू ओतावें. ह्मणजे कागद व लानेलचा कपडा या दोहोंतून गळून तें नरसाळ्याच्या नळीतून बाहेर येते. नरसाळ्याखाली कल्हईर्चे भांडे किंवा लांकडी पीप ठेऊन त्यांत तें गळन आलेले स्टिअरीन जमवावे. शोषक कागद पांढऱ्या रंगाचा असावा. कागद व लानेलचा