पान:मेणबत्त्या.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७


प्रकाश पांढरा स्वच्छ पडत नाही. जरी त्यापासून केलेल्या मेणबत्यांस स्टिअरीनच्या मेणबत्या ह्मणतां येईल, तरीपण हल्ली ज्या मेणबत्यांस 'स्टिअरीन क्यांडलस' ह्मणतात, त्या स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या केलेल्या असतात.
  याप्रमाणे चरबीपासून सुमारे शेकडा ८० भाग व लार्डपासून शेकडा ४० भाग स्टिअरीन निघतें.
 ४ खोबऱ्याचें तेल-या पदार्थाच्या मेणबत्या करीत नाहीत. परंतु या तेलांत पांढरी व कठिण (घट्ट ) स्निग्ध आसिडें आहेत. ती दाबाने काढतात. त्यांस कोको स्टिअरीन ह्मणतात. ते कोको स्टिअरीन तयार करण्याची रीत―
 मि. सोमेस यांणी सन १८२९ साली, खोबरेल तेलांतून स्टिअरीन व ओलियन निराळे काढण्याचा हक्क मिळविला. ती रीत बाजारांत मिळणारे खोबरेल तेल हायडालीक प्रेसमध्ये दाबून त्यांतील स्टिअरीन व ओलियन निराळे करावे लागते. या कामी लागणाऱ्या पिशव्या चरबी दाबण्याच्या कामी ज्या प्रकारच्या पिशव्या लागतात असें वर लिहिले आहे, त्याच कापडाच्या पिशव्या व त्यांची वेष्टणे याकामी लागतात. त्यांची लांबी रुंदीही त्याच मापाची असावी; व खोबरेल भरलेल्या पिशव्यांची मांडणी प्रेसच्या खालच्या पत्र्यावर त्याच प्रकाराने करावी. दाब सुरू करते वेळेस पिशव्यांतील द्रव्याचे उष्णमान ५०-६०°फा. अंशांचे ठेवावे लागते. हे उष्णमान तयार करण्यास त्या भरलेल्या पिशव्या लोखंडी पात्रांत ठेवून ते पात्र बर्फावर ठेवावे. ह्मणजे उष्ण हवेंतही वरील कमी उष्णमान करता येते दाब करण्यापूर्वीही ३।४ तास खोबरेलतेल ह्याच उष्ण मानावर (६००-५६ फा. अंश ) ठेवावे लागते. खोबरेल तेल भरलेलें पात्र बर्फावर किंवा बर्फाच्या पाण्यांत अथवा इतर थंड पाण्यात ठेवून तें