पान:मेणबत्त्या.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६


ह्मणजे तिचा चिकट गोळा बनत जातो. खळीसारखा चिकट गोळा झाला ह्मणजे फडक्याच्या पिशव्यांत तो भरावा. या पिशव्या तागाच्या घट्ट कापडाच्या किंवा लिंटसारख्या कापसाच्या जाड्या कापडाच्या केलेल्या असतात. प्रत्येक पिशवी दोन फूट लांब, ३-४ इंच रुंद व १॥ इंच पोकळीची असावी. या पिशव्यांत ती बरीच घट्ट झालेली चरबी भरावी; व त्या पिशव्यांची तोंडे मजबूत दोऱ्याने घट्ट बंद करावीत. नंतर त्या पिशव्यांवर मजबूत खादीच्या कापडाची वेष्टणे लावावी. ही वेष्टणे झणजे खादीच्या पिशव्याच असतात. चरबी भरलेली पिशवी बसती येईल इतकी मोठी खादीची पिशवी (वेष्टण) असावें. या चरच्या पिशव्यांची तोंडे पण दोऱ्याने बांधून बंद करावी.
 नंतर एक दाबण्याचा प्रेस घेऊन त्याच्या खालच्या शकलावर त्या पिशव्या एका ओळींत मांडाव्या. दोन पिशव्यांमध्ये थोडेसें अंतर (सुमारे १ इंच ) असू द्यावे. त्या रिकाम्या जागेतून पातळ ओलियन बाहेर निघतें, नंतर प्रेसचा स्क्रू फिरवून त्याचे वरचें शकल खाली दाबावें. ह्मणजे त्या पिशव्या दाबल्या जातात. दाबाने त्यांतील चरबी मधलें ओलियन पिशव्यांबाहेर पडून दोन पिशव्यांमध्ये ठेवलेल्या जागेंतून प्रेसच्या बाहेर येते. ते एका भांड्यांत धरून ठेवावें. प्रथम दाब हळू हळू करावा. नंतर जोर वाढवीत वाढवीत पुढे पुष्कळ जोराचा दाब करावा. याप्रमाणे दोन तीन वेळ चरबी दाबून काढली झणजे तिच्यांतील बहुतेक सर्व ओलियन पिशव्यांच्या बाहेर निघते. व पिशव्यांमध्ये घट व स्वच्छ स्टिअरीन रहाते. तें कठिण पांढरें व स्पर्शास किंचित चिकट लागते व त्यांत थोडें ओलियनही असते. या स्टिअरीनचे पातळ होण्याचे उष्णमान १४४° फा. अंश आहे. याप्रमाणे चरबी व लार्ड ह्या दोन पदार्थापासून स्टिअरीन तयार करतात. या स्टिभरीनमध्ये, ग्लिसराईन असल्यामुळे त्यापासून केलेल्या मेणबत्तीचा