पान:मेणबत्त्या.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४



 स्टिअरीन हे द्रव्य दाबाने तयार करतात. चरबी व लार्ड या दो. होतही मुख्य घटक स्टिअरीन, पामिटिन (घट्ट ) व ओलीयन (पातळ ) हे आहेत. पैकी स्टिअरीन व पामिटीन घट्ट आणि अधिक उष्णमानावर पातळ होणारे पदार्थ आहेत. ओलीयन हे पातळ व तेलासारखे असते. ह्मणून ते दोन्ही मूळ पदार्थ (चरबी व लार्ड) दाबून त्यांतील ओलीयन काढून टाकतात. नंतर स्टिअरीनच्या मेणबत्त्या करतात. लार्ड हेही एक जातीची चरबीच आहे. ह्मणून पुढे या भागांत दोहोंसही चरबी शब्दच वापरला आहे.
 चरबी दाबून काढण्यापूर्वी तीस स्वच्छ करावे लागते. यायोगें तिच्यांतून निघणाऱ्या स्टिअरीन पदार्थास वाईट वास येत नाही. बहुत. करून लार्ड या पदार्थास वाईट वास येत नाही. बहुतकरून लार्ड या पदार्थास स्वच्छ करण्याची फारशी जरूर नसते. परंतु वाटल्यास (तें खराब असल्यास ) स्वच्छ करावे लागते.
 चरबी ४ रीतींनी स्वछ करतात. त्याः
 १. आंतून शिशाची कल्हई केलेली कढई चुलीवर ठेवून तिच्यांत १०० शेर चरबी टाकावी व पातळ होऊं द्यावी. नंतर दोन शेर सलफ्युरीक आसीड, ४०-५० शेर थंड पाण्यांत मिळवून हे मिश्रण थंड झाल्यावर त्या पातळ चरबींत मिळवावें. खालीं मंदोष्णता असू द्यावी. ते सर्व मिश्रण एक तासभर खूब जोराने ढवळावे. नंतर स्थीर ठेवून सावकाश निवू द्यावे. थंड झाल्यानंतर त्या मिश्रणावर चरबीचा गोळा जमतो व खाली पाणी रहाते. तो गोळा काढून घेऊन ४०० शेर उकळत्या पाण्यात टाकावा व जोराने ढवळावा. ह्मणजे त्याच्यांतील राहिलेले सलफ्युरीक आसीड पाण्यांत मिळून तो गोळा धुतला जातो. ते मिश्रण स्थिर ठेवावें ह्मणजे चरबी वर जमते; ती काढून घ्यावी. हीच स्वच्छ चरबी होय.