पान:मेणबत्त्या.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२


 ती स्वच्छ करण्याची रीत-*बामहायड्रामिटरच्या- अंश प्रमाणाचा तीव्र सोडा द्रव ५० शेर स्वच्छ बायलरमध्ये घालून त्यांत *वाफ सोडावी. नंतर त्या द्रवाचे प्रमाण बाम हायड्रामिटरचे २६° अंश होईपर्यंत त्यांत मीठ विरघळवावे. नंतर मिश्र द्रवांत ३०० शेर चरबी मिळवून ते उकळू द्यावे. सरासरी एक किंवा दोन इंच, बायलारांतील मिश्रणाची खोली कमी होईपर्यंत उकळणे सुरू ठेवावें. मिश्रण एक दोन इंच आटून कमी झाले ह्मणजे उष्णता बंद करून ते मिश्रण तीनपासून पांच तास स्थिर ठेवावे. तीव्र सोड्याच्या द्रवामुळे त्यांतील चरबीच्या काही भागाचा साबू होतो. त्या साबूचे दोन थर होऊन एक वरती व दुसरा खाली असे जमतात, आणि त्या दोन थरांमध्ये साबू न झालेली चरबी असते ती शुद्ध चरबी होय. ह्मणून वरचा साबूचा थर काढून टाकून मधली चरबी केसांच्या चाळणीतून गाळून स्वच्छ भांड्यांत ठेवावी. साबूचा खालचा थर मात्र या चरबीत येऊ देऊ नये. वरचा व खालचा साबू अर्धवट शिजलेला असतो तो पांढरा साबू करण्याकडे वापरावा. नंतर ते बायलर स्वच्छ करून त्यांत ३५ शेर पाणी घालून एक शेर तुरटी मिळवावी. तें तुरटीचे मिश्रण उकळू लागेपर्यत गरम करावें; नंतर त्यांत ती गाळलेली चरबी मिळवून ते सर्व मिश्रण पावतास उकळावे. ह्मणजे चरबींतील मळ खाली बसतो. सर्व मळ खाली बसल्यावर तें मिश्रण तीनपासून पांच तास स्थिर ठेवावे. ह्मणजे स्वच्छ
 *बामहायड्रामिटर ह्मणजे काय व त्याचे अंशावरून द्रव कसा तपासावा ही माहिती साबूच्या पुस्तकांत दिली आहे. त्यायोगें तयार केलेल्या द्रवांत सोडा किंवा पोट्याश यांपैकी कोणताही एक क्षार किती माहे ते समजतें.
 * वाफेच्या ऐवजी विस्तवाची उष्णता बायलरखाली लाविली तरी चालते. मात्र उष्णमान २१२° फा. अंशांपेक्षा जास्त नसावें.