पान:मेणबत्त्या.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१


 जवळ जवळ नक्की प्रमाण काढण्यास पातळ होण्याचे व घनीभवनाचें अशी दोन्ही उष्णमाने काढावी लागतात.
 वरच्या रीति मेणबत्त्यांच्या इंग्रेजी पुस्तकांत दिलेल्या नाहीत. परंतु चौकस व शोधक मनुष्यास या रीतीचा मेणबत्यांच्या कामी मोठा उपयोग आहे. हे जाणून मुद्दाम इतर पुस्तकांतून घेतल्या आहेत.

भाग ३.

  मेणबत्त्यांच्या कामी लागणारी कठिण स्निग्ध द्रव्ये तयार करण्याच्या रीतीचे वर्णन या भागांत दिले आहे.
  ही द्रव्ये तयार करण्यास त्या त्या द्रव्याच्या जातीप्रमाणे मूळ पदार्थावर निरनिराळी कार्ये घडवावी लागतात. ह्मणजे त्यांत फेरफार होऊन कांहीं रूपांतर होते. नंतर त्या रूपांतर झालेल्या पदार्थातून पाहिजे तें द्रव्य या कामी घेऊन बाकीची द्रव्ये इतर उपयोगाकडे लावावी लागतात. तसेंच कांहीं मूळ पदार्थ फक्त स्वच्छच करावे लागतात; कांही स्वच्छ करून दाबावे लागतात; आणि कांहीं वर रासायनिक क्रियाप्रतिक्रिया घडवून तयार करावे लागतात. कित्येक पदार्थ तयार करतांना यांत्रिक, कित्येकांत रासायनिक व कित्येकांत तर दोन्हीही रीतींचा उपयोग करावा लागतो. ह्मणून या कामी बऱ्याच कढया, भांडी, नलिकायंत्रे, प्रेस, रासायनिक व इतर पदार्थ इतक्यांची आवश्यकता असते. त्या सर्वीचे वर्णन एकत्र देण्यापेक्षा, मागील भागांत मूळ द्रव्ये सांगितली त्याच क्रमाने ते ते पदार्थ तयार करण्याची माहिती दिली, तर अधिक सोईवार होईल. हे जाणून तोच क्रम या भागांत स्वीकारला आहे.
 १ चरबी-बऱ्याच वर्षांपूर्वी नुसत्या चरबीच्याच मेणबत्त्या करीत असत. त्याप्रमाणे ती या कामी वापरण्यापूर्वी स्वच्छ करावी लागते.