पान:मेणबत्त्या.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८


आसीड सुमारे ३० थेंब मिळवावें. हायड्रोक्लो. आ. १ भाग व पाणी २ भाग एकत्र मिळवून पातळ हायड्रो. आ. तयार करतात. नंतर वरचेवर ती नळी हालवून गरम करीत जावी ह्मणजे तळी प्लंबीक क्लोराईड जमतो व वरती स्टिअरीक व पामिटीक आसिडांचे मिश्रण जमतें ती नळी एकवार स्थिर ठेवून पुनः २।४ थेंब पातळ हा. आसीड तिच्या स टाकावे. या योगें कांहीं प्लंबीक क्लोराईड खाली बसतो की काय ते लक्षपूर्वक पहावें. बसत नाही अशी खात्री झाली ह्मणजे एकवार ती नळी हलवून स्थिर ठेवावी. काही वेळाने वरती आलेले स्टिअरीक व पामिटिक आसिडांचे मिश्रण काढून घ्यावे. नंतर तें थंड झाले ह्मणजे पांढऱ्या रंगाचे व घट्ट होते; त्यांत पाणी असल्यास कोरडे करून मग त्याचे वजन करावे. तें वजनाचे माप लिहून ठेवावे. या कृतींत गाळण्याच्या कागदास थोडा भाग चिकटून राहातो. ह्मणून तो कागद जाळून जी राख होईल तिच्यांत २।३ थेंब सलफ्युरीक आसीड मिळवून सुकवावी. नंतर त्या सुकलेल्या सलफेटचे वजन करावें. राखेच्या सलफेटच्या दर । ३०३ भागास, स्टिअरीक व पामिटीक ५६८ भाग मोजावें. याप्रमाणे राखेच्या हिशेबाचा जो आंकडा येईल त्याची व वर सांगितल्याप्रमाणे काढलेले स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या वजनाच्या आकड्यांची बेरीज करावी. जो आंकडा येईल तितक्या वजनाची स्टिअरीक व पामिटिक आसिडें त्या दोन आणे भार स्निग्ध पदार्थात आहेत असे समजावें. आणि त्यावरून शेकडा प्रमाण काढावें. या कृतीप्रमाणे लाण्यांत व तुपांत तिन्ही स्निग्ध आसिडाचे प्रमाण किती आहे तेही काढतां येते.
 आतां तपासलेल्या नमुन्यांत ओलीईक आसीड किती आहे तें समजलें; व स्टिअरीक आणि पामिटीक आसिडे मिळून एकत्र किती आहेत तेही समजले. परंतु त्यांत स्टिअरीक आसीड किती व पामिटीक आसीड किती ते समजले नाही. सबब ते कसे काढावें ती रीत सांगतो.