पान:मेणबत्त्या.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९



 एका काच पात्रांत त्या दोन्ही आसिडांचा गोळा ठेवून पातळ करावा. नंतर काचेच्या दोन नळ्या (पिपेट) घ्याव्या. प्रत्येक नळी खालच्या बाजूस निमुळती ( बारीक गोल) असून तीस शेवटी गोल वर्तुळ असते, व खालच्या बाजूस ती वांकडी असते. अशा दोन नळ्या घेऊन त्यांत. तो पातळ रस ( दोन्ही आसिडांचा) शोषून भरावा. तो रस त्या नळ्यांच्या वांकड्या भागांतच भरावा; त्या वाकड्या भागाच्या वर येऊ देऊ नये. नंतर तो रस थंड होईपर्यंत, त्या नळ्या स्थीर ठेवाव्या. नंतर पाण्याने भरलेल्या प्याल्यांत उभ्या व आधांतरी ठेवून त्या दोन नळ्यांमध्ये एक बारीक उष्णतामापक यंत्र ठेवावे. त्या उष्णतामापक यंत्राने त्या पाण्याची उष्णता मोजावयाची आहे. त्या प्याल्यास खालून उष्णता द्यावी ह्मणजे पाणी गरम होऊन त्यांतील नळ्या तापतात. नंतर त्यांतील रस पातळ होऊन पारदर्शक होतो. रस पारदर्शक झाला ह्मणजे उष्णतामापक यंत्रांतील पारा किती अंशावर आहे ते पाहून लिहून ठेवावे. यासच पातळ होण्याचे उष्णमान ह्मणतात. नंतर खालची उष्णता बंद करून ते पाणी हळू हळू थंड होऊ द्यावे. ह्मणजे त्या नळ्यांतील रस पुनः घट्ट होऊ लागतो. त्यावेळेस उष्णतामापक यंत्रांतील पारा किती अंशावर आहे ते पुनः पाहून लिहून ठेवावे. यास घनीभवनाचे उष्णमान ह्मणतात. ही दोन्ही उष्णमाने संयुक्त स्टिअकि व पामिटीक आसिडांची आहेत. ही दोन्ही उष्णमाने समजलीं ह्मणजे खाली लिहिलेल्या कोष्टकावरून त्यां रसांत स्टिअरीक आसीड किती व पामिटीक आसीड किती आहे ते समजतें.
 स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या मिश्रणाचे पातळ होण्याचे व घनीभवनाचे उष्णमान समजले असता, त्या मिश्रणांत त्यांपैकी दरेक पदार्थ किती आहे हे समजण्याचे कोष्टक.