पान:मेणबत्त्या.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७


चर क्यूबिक सेंटीमिटर ( सुमारे एक मासा ) चे आंकडे लिहिलेले असतात. त्या आंकड्यांवरून तो द्रव किती आहे ते समजते. नंतर त्या ब्युरेट नळीस खालच्याबाजूस तोटी लावलेली असते तिजमधून तो वरचा द्रव सुमारे २० मासे (२० क्यू. सें.) काक फिरवून प्लाटीनमच्या ताटांत काढून घ्यावा. नंतर ते प्लाटीनमचे ताट मद्यार्काच्या दिव्यावर धरून हळू हळू गरम करावें. ही उष्णता २१२° फा० अंशांपेक्षा जास्त नसावी. ह्मणजे ईथर उडून जातो व शुद्ध ओलीईक आसीड ताटांत रहाते. जर त्यांत कांही पाण्याचा भाग असेल तर तेंही मंद उष्णतेने उडवून द्यावे. नंतर ते ओलीईक आसीड वजन करावें. प्रथम प्लाटीनमच्या ताटाचे वजन केलेले असले तर ताटासह ओलीईक आसीड वजन करून त्यांत ताटाचे वजन वजा करावें. हणजे ओलीयक आसिडाचे वजन समजतें. नंतर २० क्यू. सें. द्रवांत सांपडलेले ओलीईक आसीड जर इतकें तर त्या ब्युरेट मधील सर्व द्रवांत किती? हैं त्रैराशिकाने काढावें. जें उत्तर येईल तेवढे ओलीईक आसीड १॥ ग्राम (दोन आणेभार) स्निग्ध पदार्थात आहे असे समजले. त्यावरून शेकडा प्रमाण त्रैराशिकाने काढावें. या पेक्षाही बरोबर प्रमाण काढणे असेल तर, त्या ईथरमिश्र द्रवाची वर सांगितल्याप्रमाणे दोन निरनिराळे नमुने काढून, निरनिराळी परिक्षा करावी. त्या दोन्ही वजनांची बेरीज करून तीस दोहोंनी भागून सरासरी काढावी. नंतर त्या सरासरीवरून शेकडा प्रमाण काढावें.
 आतां स्टिअरिक व पामिटीक आसिडें त्या साबूतून कशी काढावी ती ति लिहितो.
 वरील कृतीने ओलीईक आसीड गळाल्यावर त्या गाळण्याच्या कागदावर जो साबू राहिला असेल तो काढून घेऊन एका कांचेच्या परीक्षक नळीत घालावा. नंतर त्यांत पातळ केलेलें हायड्रोक्लोरीक