पान:मेणबत्त्या.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६


पुनः थोडा ईथर मिळवून गळू द्यावा. याप्रमाणे गाळण्याच्या कागदावरील पदार्थात इथर मिळवून धुण्याची कृती करावी. ही कृती गाळलेल्या कागदावरील साबूंतील प्लंबीकओलीयेट सर्व गळून जाईपर्यंत करावी लागते. धुवून गळून आलेल्या द्रवाचे तीन चार थेंब एका दुसऱ्या नळींत घेऊन त्यांत एक गुंजभार आमोनियम सलफाईड टाकावा. त्याने त्या द्रवास काळा रंग आल्यास, अझून कागदावरील द्रव्यांत प्लंबीकओलीयेट आहे असे समजावे. काळा रंग न आल्यास कागदावरील द्रव्यांत प्लंबीकओलीयेट नाही असे समजावें; व ह्मणून ईथर मिळवून गाळणे बंद करावें. प्रथम गाळलेला व मागाहून धुवून गाळलेले सर्व द्रव त्या बाटलीत जमतात ते १८ तोळ्यांपेक्षां ( २०० क्यु. सें.) जास्त नसावेत. आतां त्या बाटलींतील द्रवांत प्लंबीकओलीयेट व गाळलेल्या कागदावर प्लंबीक स्टिअरेट व पामिटेट असतात.
 याप्रमाणे ईथरमध्ये मिळालेला निर्गुण प्लंबीकओलीयेटचा द्रव हाती आला. त्यांतून ओलीईकआसीड काढणे आहे.
 नंतर ब्युरेट नामक कांचेची नळी घेऊन तिच्यांत ईथरमिश्रित ग्लंबीकओलीयेटचा द्रव घालावा. नंतर त्यांत २० मासे (२० क्यु. सें.) हायड्रोक्लोरीक आसिडाचा द्रव मिळवावा. हायड्रोक्लोरीक आसीड एक भाग व पाणी २ भाग याप्रमाणाने हायड्रोक्लोरीक आसिडाचा द्रव तयार करावा. नंतर त्या नळीस बूच मारून ती जोराने वर खाली हलवावी. ह्मणजे सर्व मिश्रण एकत्र मिळते. नंतर ती नळी स्थीर ठेवावी.
 स्थीर झाल्यावर प्लंबीक क्लोराईड तळी जमतो व ईथरमिश्रितओलीईक आसीड वरती येते. वरच्या द्रवांतून प्लंबीक क्लोराईड तळीं उतरत नाहीं असें दिसल्यावर, ईथर मिश्रित ओलीईक आसिडाचा द्रव किती आहे ते त्या नळीवर लिहिलेल्या आंकड्यावरून पाहून लिहून ठेवावे. त्या नळीवर मापाच्या आडव्या रेषा पाडलेल्या असतात व त्या रेषां―