पान:मेणबत्त्या.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिश्रण चांगले ढवळावे व स्थीर ठेवावें; ह्मणजे तो साबू धुतला जाऊन तळी जमतो व पाणी वरती येते. या कृतीस तो साबू धुणे अशी पारिभाषिक संज्ञा आहे. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. व तळचा साबू काढून प्लाटीनमच्या ताटांत ठेवावा. या रीतीने शिशाचा निर्गुण साबू तयार होतो त्यांत १ प्लंबीक ( शिशाचा ) ओलीयेट) इतके पदार्थ रसायन रीतीने तयार " स्टिअरेट होतात. ३ पामिटेट) पहिला पदार्थ ईथरमध्ये द्रवीभूत होतो ( विरघळतो ) व दुसरे दोन इथरमध्ये अगदी द्रवीभूत होत नाहीत. ते ताट दिव्यावर गरम केलें ह्मणजे त्या साबूतील पाण्याचा अंश नाहीसा होतो. नंतर प्लाटीनमच्या सुरीने तो साबू खरवडून काचेच्या चंबूत टाकावा. नंतर तें प्लाटीनमचे ताट इथरनें धुवून तो इथर त्या चंबूत टाकावा. नंतर तो चंबू ईथरने भरावा. चंबूत प्लाटीनमचे ताट धुतलेला व पुनः मिळविलेला असे दोन्ही ईथर आणि तो शिशाचा सर्व साबू इतके पदार्थ असतात. नंतर त्या चंबूस बूच मारून तो पांच पांच मिनिटांनी हलवीत जावा. असे दोन तीन तास केल्यावर तो चंबू स्थीर ठेवावा. नंतर कांचेच्या नरसाळयावर त्याच्या खोलगटपणांत गाळण्याचा कागद बसवून तें नरसाळे गाळण्याच्या कुपीत ( बाटलीत ) लागू करावें. नरसाळ्यांतील कागदावर चंबूतील मिश्रण सर्व ओतावे ह्मणजे इथरमध्ये विरघळलेला पदार्थ ईथरसह, गाळण्याच्या कागदांतून उतरून खालच्या बाटलीत येतो. ईथरमध्ये प्लंबीकओलीयेट द्रवतो व बाकीचे दोन्ही द्रवत नाहीत. झणून ते गाळण्याच्या कागदावर वर रहातात; आणि प्लंबीकओलियेट ईथरबरोबर बाटलींत गाळला जातो. गाळलेल्या कागदावरील पदार्थात