पान:मेणबत्त्या.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४



 मद्यार्काचा दिवा लावून ठेवावा. एक, कांचेची परीक्षक नळी घेऊन तिच्यांत ज्या स्निग्धपदार्थातील स्निग्ध आसिडें काढावयाची असतील तो दोन आणे भार ( २२ प्रेन किंवा १॥ ग्राम) घालून उष्णतेवर पातळ करावा. त्यांत सुमारे २॥ गुंजा (४ ग्रेन) आलकोहलीक पोट्याश, ३० थेंब पाण्यात मिळवून तो द्रव मिळवावा. ते सर्व मिश्रण 'दिव्यावर गरम करून त्याचा साबू बनवावा. नंतर त्या साबूत सुमारे दीड तोळा उकळते पाणी मिळवून तो साबू पातळ करावा. त्या 'पातळ साबूत काळजीपूर्वक आसेटीक आसीड मिळवावें. साबूचा पातळ द्रव थोडासा अम्ल ( acid ) होईपर्यंत आसेटीक आ. मिळवावें. पुनः पोट्याश द्रव त्या अम्ल द्रवांत मिळवून, तो अम्ल द्रव निर्गुण ‘करावा. तो द्रव प्रथम अम्ल झाला की नाही ते तपासण्यास परीक्षक कागदाची जरूर नसते. फक्त त्यांत पांढरवट व कायमचें चोथापाणी दिसले ह्मणजे तो अम्ल झाला असे समजावे. या अम्ल होण्याच्या कृतीस, साबूचा पातळ द्रव उकळत असतांना, ८।१० थेंब आसेटीक आसीड त्यांत मिळविलें ह्मणजे पुरे होते. नंतर पुनः २।३ गुंजा पोव्याशचा द्रव करून त्या अम्ल द्रवांत मिळविला ह्मणजे तो सर्व द्रव निर्गुण होतो. तो द्रव स्वच्छ झाला ह्मणजे निर्गुण झाला असे समजावें. ल्या द्रवांत चोथापाणी दिसत नसून किंचित पांढरवट रंग दिसला ह्मणजे द्रव स्वच्छ झाला असे समजावें.
 या स्वच्छद्रवांत ४-६ गुंजा प्लॅमबाय आसिटेट मिळवावे. नंतर तें मिश्रण कांचेच्या कांडीने ढवळीत असावे. ह्मणजे त्या नळीत, तळी साबू व वरती पाणी अशा प्रकारचे मिश्रण होते. सर्व साबू तळी जमेपर्यंत ढवळणे सुरू ठेवावे. ढवळण्याचे काम काचेच्या काडीने करावे. नळीच्या तळी सर्व साबू जमला ह्मणजे वरचे पाणी हळूच काढून टाकावे. नंतर तळाच्या साबूत उकळते पाणी २-२॥ तोळे घालून ते