पान:मेणबत्त्या.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०


पदार्थ पातळ होऊन नळीत ब जवळ दाखविलेल्या स्थितीत उतरतो. या वेळेस ऊष्णतामापक यंत्रांतील पारा कोणत्या अंशावर आहे, ते पाहून लिहून ठेवावें या अंशाच्या ऊष्णतेस त्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे पूर्ण ऊष्णमान (concluding point of fusion ) ह्मणतात. या होन्ही ऊष्णमानांत फारसें अंतर नसते. बहुधा ३°४° सेंटीग्रेट अंशाची तफावत असते. शुद्ध स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे पूर्ण ऊष्णमान बरोबर समजत नाही. परंतु स्निग्ध आसिडांचे पातळ होण्याचे पूर्ण ऊष्णमान मात्र बरोबर समजते. याचे कारण स्निग्ध आसिडांपेक्षां स्निग्ध पदार्थ कमी ऊष्णमानावर पातळ होतात. ह्मणून शुद्ध स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे आरंभी ऊष्णमान समजलें मणजे पुरे आहे. या कृतींत कांचपात्रांतले पाणी गरम होते व त्या गरमीच्या योगाने त्या नळीस ऊष्णता लागून तिच्यांतील पदार्थ पातळ होतो ह्मणून त्यावेळचे पाण्य चे जें ऊष्णमान तेंच त्या पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान समजतात. आणि यास्तव त्या पाण्यांत ऊष्णतामापक यंत्र लागू करून त्याने त्या पाण्याची त्या वेळची ऊष्णता मोजतात.
 ऊष्णतामापक यंत्र सेंटीग्रेडचे किंवा फारेन्हाईटचे जसे असेल त्या प्रकारचे अंश समजावे.
 याप्रमाणे तपासलेल्या कित्येक स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान खाली लिहिले आहे:―