पान:मेणबत्त्या.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९



कोणत्याही स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान काढण्याची

रीति - ही रीत बेन्सम्यान साहेबांनी काढली आहे.


 

आकृती नंबर १ मध्ये दाखविलेल्या ब आकाराची कांचेची नळी घ्यावी. नंतर ज्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्णमान काढणे असेल, तो पदार्थ घट्ट असल्यास पातळ करून त्याचे एक दोन थेंब त्या नळीत टाकावे. ब नळीत क प्रमाणे तो पदार्थ थंड होऊ द्यावा. तो लौकर थंड न झाल्यास ती नळी बर्फीत किंवा थंड पाण्यांत ठेवावी. या

प्रमाणे त्या नळीत तो पदार्थ पूर्ण थंड होऊ आकृति १ ली. द्यावा, नंतर अ अ कांचपात्रांत थंड पाणी

घालून ती नळी त्यांत ठेवावी. त्या थंड पाण्यांत एक ऊष्णतामापक यंत्र ड त्यांतील पायाचा गोळा त्या पाण्यांत राहील असे ठेवावे. नंतर त्या पाण्याच्या कांचपात्रास, खालून मंद ऊष्णता लावावी. ही उष्णता मेणबत्तीच्या ज्योतीची असली तरी चालते, ह्मणजे ते पाणी गरम होऊ लागते. पाण्याची ऊष्णता नळीस लागली, ह्मणजे तो घट्ट पदार्थ त्या नळीत खाली उतरूं लागतो. या वेळेस त्या पाण्यातील ऊष्णतामापक यंत्रांत पारा किती अंशावर आहे, ते पाहून लिहून ठेवावे. या अंशाच्या ऊष्णतेस त्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे आरंभीचे उष्णमान (initial point of fusion ) ह्मणतात. नंतर त्याच रीतीनें तो पदार्थ हळूहळू व जवळील स्थितीत येईपर्यंत ऊष्णता सुरू ठेवावी. तो सर्व