पान:मेणबत्त्या.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१


योगी स्निग्ध आसिडें आहेत. ही घट्ट आसिडें दाबाने किंवा पुढे दिलेल्या स्निध आसिडांच्या रीतीप्रमाणे तयार करावी.
 २२. सरक्यांचें तेल:-कापसाच्या बियांस सरक्या ह्मणतात. जेथें कच्चा रू (कापूस) पिंजला जातो, तेथें सरक्या पुष्कळ तयार होतात. त्या सरक्या प्रेसमध्ये किंवा घाण्यांत दाबून त्यांचे तेल काढतात. तें तेल काळसर लाल रंगाचे व बरेंच दाट असते, बंगाल प्रांती सरक्यांचें तेल पुष्कळ तयार होते. चरबी दाबून जसें स्टिअरीन काढतात तसेंच सरक्याचें तेल दाबून सरक्याचे स्टिअरीन काढतात. सरक्याचे स्टिअरीन पिवळट किंवा काळसर पांढरवट रंगाचे व चरबीपेक्षा बरेच जास्त घट्ट असते. त्या सरक्यांच्या स्टिअरीनचे पातळ होण्याचे ऊष्णमान ९०° फा. अंश आहे. या सरक्यांच्या स्टिअरीनपासून काढलेल्या स्टिअरीक आसिडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान ९९°फा. अंश आहे. परंतु स्निग्ध आसिडाप्रमाणे जर हे तयार केले, तर त्याचे पातळ होण्याचे उष्णमान अधिक वाढते. या घट्ट पदार्थाचा उपयोग मिश्र मेणबत्त्या करण्याकडे करतात. साबू व कृतीचे लोणी करण्यांतही याचा उपयोग पाश्चात्य देशांत करूं लागले आहेत.
 २३. तूप-हा प्राणिज पदार्थ आहे. हा प्राणिमात्रांच्या दुधापासून तयार करता येतो. तरी बाजारांत मिळणारे तूप बहुतकरून मशी, गाई, शेळ्या मेंढ्या व कचित् उंट व गाढवे या जनावरांच्या दुधापासून तयार केलेले असते. तूप हे चरबीप्रमाणेच घट्ट व पांढरे असते. यांतून घट्ट स्निग्ध आसिडें दाबाने काढतां येतात. लोण्यांतूनही घट्ट स्निग्ध आसिडे निघतात. त्या दोहोंतही स्टिअरीक, पामीटिक, ओलिईक व बटेरीक आसिडे आणि ग्लिसराईन हे मुख्य घटक आहेत. चरबीपासून जसें स्टिअराईन दाबाने काढतात, तशी तुपापासूनही वरची घट्ट