पान:मेणबत्त्या.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३



बियांचे तेल तुपाऐवजी पुष्कळ लोक खाण्याच्या कामी व पुष्कळ लोक जाळण्याच्या कामी वापरतात. गुजरात प्रांती या तेलाचा धुण्याचा साबू करतात. हे तेल साधारण हवेवर तुपासारखें घट्ट असते. रंग पांढरवट पिवळा असतो. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान १२०० फा. अंश आहे. हे तेल प्रेसमध्ये दाबून काढले तर पातळ भाग निघून प्रेसामध्ये पांढरवट रंगाचा गोळा जमतो, त्याच्या मेणबत्त्या दाबलेल्या चरबीच्या मेणबत्त्यांसारख्या होतात. किंवा शुद्ध व घट्ट स्निग्ध आसीड त्यांतून पुढे लिहिलेल्या रीतीप्रमाणे काढावें. या तेलाचे पातळ होण्याचे ऊष्णमान जर १२०° फा, अंश आहे तर, त्यांतून निघणाऱ्या घट्ट स्निग्ध आसीडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान त्यापेक्षा अधिक असले पाहिजे. हे तेल घट्ट असते ह्मणून इंग्रजीत त्यास महवा बटर ह्मणतात. याचे घटक अद्याप समजले नाहीत.
 २१. कोकंबलः–हें तेल आंबसुलाच्या बियांपासून कोकण व मलबारप्रांती फार तयार करतात. हे मेणापेक्षा अधिक कठीण व पांढरें असते. ताजे किंचित् पिवळट रंगाचे व काही दिवस झाल्यावर पांढरे रंगाचे होते. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान ९४ फा. अंश आहे. याचे घटक स्टिअरीक ओलिइक, लारीक पामिटीक व आरेचिडीक आसिडें व ग्लिसराईन इतके पदार्थ आहेत. पैकी पहिली दोन आतिडें अधिक प्रमाणाने व बाकीची कमी प्रमाणाने त्यांत असतात. त्यांत पहिले, तिसरें, चवथे आणि पांचवें ही चारही मेणबत्त्यांच्या कामी उप_* त्याचप्रमाणे कोकंबेल तेलाचा साबू उंची प्रकारचा होतो. डुकराच्या चरबीचा साबू उंची प्रकारचा असतो, ह्मणून ज्या लोकांस डुकराची चरबी वापरणे अयोग्य वाटत असेल, त्यांणी कोकंबेल तेलाचा उपयोग करावा.