पान:मेणबत्त्या.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५



अवलंबून असते. जितकें पामिटीक आसीड त्यांत अधिक असेल, तितकें त्याचे पातळ होण्याचे उष्ण मान कमी असते. शोध करण्यास्तव रसायनशाळेत तयार केलेले ह्मणून शुद्ध जे स्टिअरीक आसीड त्याचे पातळ होण्याचे ऊष्णमान वर दिले, परंतु मोठ्या प्रमाणावर व्यापारी कामांत जे स्टिअरीक आसीड तयार होते, त्याचे पातळ होण्याचे ऊष्ण मान बरेच कमी असते. त्याचे कोष्टक पुढे दिले आहे. याशिवाय मेणबत्त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या व आपल्या देशांत उत्पन्न होणाऱ्या वस्तु आहेत. त्यांची माहिती खाली दिली आहे:--१ भुइमुगाचे तेल. २ मोहाच्या बियाचे तेल. ३ कोकंबेल. ४ सरक्यांचे तेल. व ५ तूप.
 १९. भुइमुगाचे तेल: हें तेल भुइमुगाच्या दाण्यापासून दाबाने काढतात. हिंदुस्थानांत हे पुष्कळ तयार होते. या तेलांत आरेचीडीक आसीड नांवाचे एक पांढरें व घट्ट स्निग्ध आसीड आहे. या आसिडाचे पातळ होण्याचे ऊष्णमान १६७° फा. अंश आहे. तें रंगांत पांढरे व बांध्यांत कठीण आहे १०० भाग भुईमुगाच्या तेलांतून ४-५॥ भाग आरेचिडीक आसीड निघते, असे आसन साहेब लिहि. तात. स्टिअरीक आसिडापेक्षाही याचे पातळ होण्याचे ऊष्णमान अधिक आहे. या तेलांत जरी थोडें आरेचिडीक आसीड निघते, तरी ओलीईक आसीड पुष्कळ निघते; त्याचे पामिटीक आसीड कृतीने तयार करावें. दोन्ही रीती पुढे येतील.
 २०. मोहाच्या बियांचे तेल-मोहाची झाडे हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. बडोदें सरकारच्या नवसरी, कडी व बडोदें प्रातांत, मलबारकिनाऱ्यावर तर ही झाडे अतिशय आहेत. या झाडांची पाने हिंदुलोकांनी पवित्र मानिली आहेत. या झाडाच्या चिकापासून एक जातीचा रबर तयार होतो; फुलांपासून पिण्याची दारू करतात आणि त्याच्या