पान:मेणबत्त्या.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४


अन समुद्रातील स्वाताई आस्ट्रो नामक बेटांत या मेणासारखाच एक पदार्थ सांपडतो त्यास नेफटगील असें नांव आहे. बाजारांत मिळणारे ओझोकिरीट घट्ट तपकिरी रंगाचे, कधी पिवळ्या, व कधी काळ्या रंगाचे असते. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान १४०° फा. अंश आहे. हे चांगले शुद्ध केले तर त्यापासून दर शेकडा ८०-९० भाग प्याराफीन मेण निघते, असें मि. फील्ड ह्मणतात. हे शुद्ध करण्याची रीत पुढे येईल.
 १८. स्निग्ध आसिडें:–ही स्निग्ध आसिडें स्वतःसिद्ध असत नाहीत. ती वनस्पतिज तेलांतून व चरबीतून काढतात. ही आसिडें तीन प्रकारची आहेत. स्टिअरीक, पामिटीक व ओलिईक आसीड अशी यांची नावे आहेत. खोबऱ्याचे स्टिअरीक आसीड खोबरेल तेलापासून स्टिअरीक आसीड चरबीपासून, पामिटीक असीड ताडाच्या तेलापासून, काढतात. मेणबत्या करण्यांत बहुतकरून स्टिअरीक व पामिटीक आसिडें मिश्र करून तो संयुक्त पदार्थ वापरतात. तयार करितांना चरबी व ताडाचे तेल मिश्र करून त्यापासून हा संयुक्त पदार्थ काढतात. सर्व वनस्पतीज तेलापासून पातळ ओलिईक आसीड हे, ती वरची घट्ट दोन्ही आसीडें तयार करतांना उत्पन्न होते. त्या ओलिईक आसीडचा उपयोग फक्त साबू तयार करण्यांतच फार दिवस करीत असत परंतु नवीन शोधाप्रमाणे त्या पातळ ओलिईक आसीडापासूनही काही रसायनिक कृतीनें घट्ट असें पामिटिक आसीड आलीकडे तयार करून त्याचाही उपयोग मेणबत्या करण्याकडे करतात. ही आसिडें तयार करण्याची रीत पुढे येईल.
 स्टिअरीक आसिडाचे पातळ होण्याचें ऊष्णमान १९९° फा. अंश आहे. पामिटीक आसिडाचे पातळ होण्याचे उष्णमान १४३.५° फा. अंश आहे. परंतु पामिटीक व स्टिअरीक आसिडांच्या मिश्र पदार्थाचें पातळ होण्याचे उष्णमान त्यांत असणाऱ्या पामिदीक आसिडांच्या प्रमाणावर