पान:मेणबत्त्या.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२


पातळ होण्याचे ऊष्णमान ११६०-१२०° फा. अंश आहे. त्याचे मुख्य घटक पामिटीक, मिरीस्टीक आसिडे व ग्लिसराईन हे आहेत. याच्या केलेल्या मेणबत्त्या १८८६ साली कलोनियल व इंडिअन प्रद. र्शनांत केप ऑफ गुड होप येथून मे. हाल व झीन यांनी पाठविल्या होत्या. त्या जळतांना त्यांतून धूर निघत असे व चरबीसारखा वास येत असे. परंतु त्या मेणबत्त्यांवर जळतांना ओघळ उतरत नव्हते.
 १५. ताडाचे मेण:-हे सेरोग्झीलान आनडीक्लोआ जातीच्या ताडाच्या झाडांच्या खोडापासून काढतात; याचे घटक अद्याप समजले नाहीत. याचे पातळ होण्याचे उष्णमान १६१०-१८६° फा. अंश आहे.

खनिज मेण.

 १६. प्याराफीन मेण:-हे काही ठिकाणी जमिनीत सांपडते, अथवा पेट्रोलियम (केरोसीन तेल) दगडी कोळसे, लाकडी डामर या पदार्थापासून नळिकायंत्राने अर्क रूपाने काढतात. शुद्ध प्याराफीनचें पातळ होण्याचे ऊष्णमान ११३०-१४९° फा. अंश आहे. हे नरम, पांढरें, गंधहीन व चवरहित असते; हे पातळ होण्याच्या ऊष्ण मानापेक्षा कमी ऊष्ण मानावर लवलवीत असते. ह्मणून मेणबत्या करतांना त्यांत मोहळाचे मेण किंवा स्टिअरीक आसीड मिळवितात. शुद्ध करण्याची रीत पुढे येईल.
 १७. ओझोकिरीट:-हे मेण भूपृष्ठाच्या तिसऱ्या थरांत कित्येक ठिकाणी सांपडते. ग्यालिसिया प्रांतांत बेरीसला ड्रायहोवाईन या ठिकाणी आणि क्यास्पिअन समुद्राच्या चिलीकेन नावाच्या बेटांत व कारपेथियनघ्या सखल जमिनींत हे मेण फार शुद्ध व पुष्कळ प्रमाणानें सांपडते. लंडन येथील मे. फील्ड व कंपनी याच्याही मेणबत्त्या बनवितात. कास्पि