पान:मेणबत्त्या.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१


पातळ होण्याचे उष्णमान १८२°-१८५° फा० अंश आहे. याचे मुख्य घटक सेरोटीक आसीड व दुसरे पातळ पदार्थ आहेत.
 ते फार टणक असल्यामुळे, इतर नरम पदार्थांच्या मेणबत्त्यांस काठिण्य आणण्याकरिता त्यांत मिळवितात. जर शेकडा २ भाग हे मेण मिळविले तर ती मेणबत्ती फुटू लागते, इतकें तें कठिण आहे. ह्मणून फार कमी प्रमाणाने तें मेण इतर द्रव्यांत मिळवून मेणबत्ती बनवावी लागते, असे एका कारखानदाराचें ह्मणणे आहे. परंतु २ हा आंकडा २० बद्दल चुकून पडला असावा असे दिसते.
 १२. चिनी वनस्पतींपासून काढलेले तेल:-स्टिलिंजीया सेबीफेार नामक झाडांच्या फळांतील गिरापासून हे मेण काढतात.

तें काढण्याची चिनी लोकांची कृतिः

 १. पक्क फळे खरबरीत कुटून चाळून त्यांची वरची साल काढून टाकतात.
  २. नंतर ते कूट लांकडी भांड्यांत घालून गरम करतात. ह्मणजे त्यांतील मेण नरम होते.
 ३. नंतर ते मिश्रण दगडी उखळांत घालून कुटतात. ह्मणजे वनस्पतीचा भाग व मेण निराळी होतात. नंतर तो गोळा चाळणींत ठेवून गरम करतात ह्मणजे पातळ मेण खाली पडतें, व वनस्पतीचा भाग चाळणीत रहातो.
 ४. नंतर गवताच्या पिशव्यांत तें मेण ठेवून प्रेसमध्ये दाबून काढतात. ह्मणजे शुद्ध मेण बाहेर निघतें व कचरा पिशव्यांत रहातो. हे मेण कठिण, पांढरें, चवरहित व गंधहीन असते. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान सुमारे १०४° फा. अंश आहे. याचे