पान:मेणबत्त्या.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०


ळत्या आलकोहलचें, आसिडांचे किंवा आलकलींचें रसायनीक कार्य घडत नाही. त्याचे मुख्य घटक सेरिलीक व सेरोटीक आसिडें होत.
 चिनांत एकट्या त्याच पदार्थाच्या मेणबत्त्या तयार करतात. परंतु नरम जातीच्या चरबींत मिळविण्याच्या, आणि लवकर विरघळणाच्या पदार्थाच्या मेणबत्त्यांस वरून लावण्याच्या कामी याचा उपयोग दुसरे लोक करतात. ह्मणजे ती मेणबत्ती जळतांना तिच्यावर ओघळ येत नाहीत. त्या पदार्थास नेहमी आलकानेटरूट ( सुरंगी ) व जंगाल या पदार्थाचा तांबडा व हिरवा रंग देतात.
 १०. स्पासिटी:-स्परम नामक माशांच्या तेलांत हा पदार्थ सांपडतो. स्वच्छ केलेले स्पासिटी द्रव्य पांढरें, पत्रेदार, ठिसूळ गंध. हीन व चवहीन असते. याचे मुख्य घटक सेटील व पामिटीक आसीड हे आहेत. रासायनिक रीतीने हे निर्गुण असते. याचे पातळ होण्याचे ऊष्णमान ११००-१२०° फा० अंश आहे. हे तयार करण्याची रीत पुढे येईल.

वनस्पतिज मेण.


 ११. कारनोबा मेण:-कार्नुबा पाम नांवांच्या झाडाची फळे, देठ व पाने यांजवर या मेणाचे बारीक थर जमतात. ही झाडे ब्राझील देशांत फार आहेत. या झाडांस कोपर्निसीआ सेरीफेरा असें ल्याटीन भाषेत नांव आहे. हे ताडाच्या जातीचे झाड आहे. याचा थर असणारी फळे पाने वगैरे सुकवून त्यावरील मेण सोलून काढतात. किंवा मातीच्या भांड्यांत ते पदार्थ शिजवून ते मिश्रण स्थीर ठेवितात. ह्मणजे काही वेळाने तें मेण घट्ट होते. ते पिवळ्या रंगाचे असून फार कठिण व ठिसूळ असते. परंतु कृतीने शुद्ध केले झणजे पांढरे स्वच्छ होते. त्याचे