पान:मेणबत्त्या.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९


तळ होऊन पाण्यात उतरते. नंतर ते फडक्यांतून गाळून घेऊन त्याच्या मोठाल्या वड्या पाडतात तें मेण फिकट पिवळ्या किंवा तपकिरी रंगाचें असते. त्यास एक प्रकारचा चांगला सुगंध येतो. तें ३२° फा. अंशावर ठिसूळ असते. ८८° पासून ९०° फा. अंशावर तें नरम व चिकट होते;आणि १४ . ° पासून १५५° फा. अंशावर पातळ होते. बाजारांत मिळणारे मेण फिकट पिवळ्या, पांढऱ्या किंवा काळ्या महागनी रंगाचे असते.
 हेनर साहेबांनी मेणाचे १८ नमुने तपासले त्यांत खाली लिहिलेले घटक सांपडले:-१०० भाग मेणांत सुटे सेरोटीक आसीड १३-१६ भाग सरासरी १४.४०, मिरसीन (साबु होणारा पदार्थ) ८६-८९.६ भाग. सरासरी ६६.६० भाग. मेणबत्त्यांच्या कामी मेणाचा उपयोग करणे असेल तेव्हां त्यास शुद्ध करावे लागते. ती रीत पुढील भाग त येईल.
 ९. पीला अथवा चिनी मेण: हें फ्राग्झिनस चायनेसीस नामक झाडांच्या कोवळ्या फांद्यावर, काक्ससपीला नामक जंतूपासून उत्पन्न होते. हे चीन देशांत फारच तयार होते. तें, झाडापासून खरवडन काढतात. एका मोठया पंचपात्राकार भांड्याच्या तोंडावर फडके ठेवून त्यावर ते मेण ठेवितात. ते भाडे उकळत्या पाण्यांत ठेविलें झणजे मेण पातळ होऊन त्या भांड्यांत पडते. थंड झाल्यावर काढून बाजारांत विकावयास नेतात.
 तें स्वच्छ पांढरें, अर्धपारदर्शक व चकचकीत असते. त्याचा बांधा रवेदार कठिण असतो. त्याचे पातळ होण्याचे ऊष्णमान १८०° फा. अंश आहे. तें स्पासिटी नामक पदार्थापेक्षां फार कठीण असतें. त्यास गंध व चव नसते. तें दांतांखाली चावले असता त्याची कोरडी भुकटी होते ती दांतास चिकटत नाही. ते पाण्यांत अविद्राव्य आहे. परंतु सुगंधी तेले, नेपथा या पदार्थात द्रवीभूत होते. त्याजवर उक