पान:मेणबत्त्या.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८



यांत पामिटीन थोडे असते. याचे घटक ओलिईक, स्टिअरीक, पामिटीक, मिरिस्टीक, लारीक, क्याप्रीक, क्याप्रिलीक क्याप्रोईक आसिडें व ग्लिसराईन इतके आहेत. त्यांत पहिली चार स्निग्धआसिडें दुसऱ्या चार आसिडांपेक्षा अधिक उष्णमानावर पातळ होतात. या तेलाचे पातळ होण्याचे ऊष्णमान ८६° फा. अंश आहे. दुसरे व तिसरें अशी दोन्ही आसिडें मेणबत्त्याच्या कामी वापरतात.
 ७. पाइनी तेल:-व्हेटेरीआ इनडिका नांवाच्या झाडांच्या फळांपासून हे तेल काढतात. या झाडास सांवतवाडीकडे शिवणीचे झाड ह्मणतात. ती सांवतवाडीकडे व हिंदुस्थानचे पश्चिमकिनाऱ्यावर पुष्कळ आहेत. त्या झाडांची फळे कुटून भाजून ऊन पाण्यात चांगली उकळून तेल काढतात. तें तेल थंड झाले झणजे घट्ट असते. त्याचा रंग पांढरवट किंवा फिकट पिवळा असतो. त्याचे पातळ होण्याचे उष्णमान ९५°-९७° फा. अंश आहे. आलीकडे याचा उपयोग मेणबत्त्यांच्या कामी थोडा होतो.
 मेण-यास इंग्रेजीत व्याक्स ह्मणतात. व्याक्स हा पदार्थ प्राणिज, वनस्पतिज व खनिज असा तीन प्रकारचा मेणबत्त्यांच्या कामी वापरला जातो. परंतु हल्ली ज्या उत्तम व्याक्स क्यान्डलस नांवाच्या मेणबत्त्या बाजारांत मिळतात, त्या प्याराफीन नामक खनिज मेणाच्या केलेल्या असतात. हे सर्व प्रकारचे मेण साधारण उष्णमानावर घट्ट असते. पाणी उकळण्यास लागणाऱ्या ऊष्णमानापेक्षा कमी ऊष्णमानावर मण पातळ होते. पाण्यांत द्रवीभूत होत नाही; परंतु ईथर, क्लोरोफार्म, काबोन डायस. लफाईड आणि स्थीर व अस्थीर तेलें या पदार्थात द्रवीभूत होते,

प्राणिज मेण.


 ८. मधमाशांचे मेणः- मधमाशांच्या पोळ्यांतून मध काढून घेतल्यावर ते पोळे ऊन पाण्यात ठेवले झणजे त्यांतील मेण पा–