पान:मेणबत्त्या.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७


लावणी, कोडीए ह्यांच्या ऐवजी याच्या मेणबत्त्यांचा उपयोग हलक्या कामाकडे करतात. कचित् स्टिअरीक आसिडांत हे मिश्र करून त्याच्या मिश्र मेणबत्त्या बनवितात. तरी पण या तेलांतील शुद्ध व घट्ट स्निग्ध आसिडे काढली तर त्याचा उपयोग चांगल्या मेणबत्त्या करण्याकडे होऊ शकतो. ती शुद्ध व घट्ट स्निग्ध आसिडें स्टिअरीक आसिडाप्रमाणेच काढतात. खोबरेल तेल हिंदुस्थान, सिलोन व अमेरिकेत पुष्कळ तयार होते. तरी कोचीन येथील खोबरेल तेल फार चांगले असते.
 ५. ताडाचे तेल:-हें तेल ताडांच्या फळांपासून आफ्रिकेंत पुष्कळ तयार करतात. त्याचा रंग नारिंगासारखा पिवळा किंवा काळसर पिवळा असतो. यास साध्या साबूसारखा वास येतो. तो वास व्हायवोलेटसारखा असतो. हे तेल साधारण उष्णमानावर बरेंच घट्ट असते. या तेलाचे पातळ होण्याचे उष्णमान ११७.५ फा. अंश आहे. या तेलांत शेकडा ७० भाग ओलिईन व ३० भाग पाभिटीन नामक द्रव्ये असतात. त्या पामिटीनमध्ये पामिटीक आसीड असते. पामिटीक आसीड हे स्निग्ध आसीड आहे. त्याचे पातळ होण्याचे उष्णमान १४३.५° फा० अंश आहे. ते स्वच्छ, पांढरें, कठिण व नरम चकाकीत द्रव्य आहे. या आसिडाच्या मेणबत्त्या चांगल्या होतात. परंतु बहुतकरून चरबी व ताडाचे तेल एकत्र करून पढच्या भागांत सांगितलेल्या रीतीप्रमाणे त्या मिश्रणापासून घट्ट स्निग्ध आसीड काढतात व तेंच मेणबत्त्यांच्या कामी फार वापरतात. त्या घट्ट स्निग्ध आसिडांत स्टिअरीक व पामिटीक अशी दोन्ही आसिडें मिश्र असतात.
 ६. ताडाच्या बियांचें तेल-हे तेल ताडफळांच्या बियांपासन व कचित् वरच्या सालींपासून काढतात. त्याचा रंग किंचित लालसर पिवळा असतो. त्यास खोबरेल तेलासारखा गंध येतो. ताडाच्या तेलापेक्षा